एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:34+5:302021-08-19T04:19:34+5:30
राज्यभरातील आरटीओ कार्यालयात आणि कार्यालयाभोवती गराडा घालणारे एजंट हे काही नवीन नाही. मध्यंतरी एजंटांना चपराक बसून कामात पारदर्शकता यावी ...

एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात काडीही हालत नाही
राज्यभरातील आरटीओ कार्यालयात आणि कार्यालयाभोवती गराडा घालणारे एजंट हे काही नवीन नाही. मध्यंतरी एजंटांना चपराक बसून कामात पारदर्शकता यावी यासाठी एजंटांना कार्यालयात मनाई करण्यात आली होती. मात्र, उपयोग झाला नाही.
इन्फो बॉक्स..
अधिकारी म्हणतात, एजंट फ्री कार्यालय
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार पारदर्शक राहावा यासाठी एजंटांना कार्यालयात येण्यास मनाई केली आहे.
मात्र, आरटीअेा कार्यालयात एंजट सर्रास कामकाज करीत असतात. अधिकाऱ्यांच्या मते मात्र हे एजंट फ्री कार्यालय आहे.
इन्फो बॉक्स
या सुविधा विनाएंजट घेऊन दाखवाच!
वाहन फिटनेस सर्टिफिकेट
१ चारचाकी वाहन फिटनेस सर्टिफिकेटसाठी शासकीय फी वाहन संवर्गानुसार आकारली जाते. त्यात मालकासाठी बाराशे रुपये घेतले जातात. हेच काम एजंटमार्फत केले तर दुप्पट रक्कम अर्जदाराला एजंटला द्यावी लागते.
---
पर्मनंट लायसन
२ दुचाकी वा चारचाकी यांपैकी कोणतेही एक लर्निंग लायसन्स काढण्यासाठी शासकीय फी १५१ रुपये आहे. दोन लर्निंग लायसन्ससाठी ३०२ रुपये फी आहे. दोन्ही एकत्र लायसन्सला १०६६ रुपये मोजावे लागतात. जर हेच काम एजंटमार्फत केले तर एका लर्निंगसाठी १५०० आणि पक्क्या लायसन्सला दोन-अडीच हजार रुपये मोजावे लागतात
३ गाडी दुसऱ्याच्या नावावर करणे
गाडी दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी वाहन संवर्गानुसार शासकीय फी आकारली जाते. यात दुचाकीसाठी साडेचारशे रुपये, त्यात पोस्ट, स्मार्ट कार्ड चार्ज आकारला जातो, तर चारचाकीला साडेपाचशे रुपये फी आहे. त्यात २५० रुपये स्मार्ट कार्ड, ५० रुपये पोस्ट चार्जचा समावेश असतो.
इन्फो बॉक्स
दीडशेवर एजंट करतात काम
१ प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटांना येण्यास मनाई असली, तरी बहुतांशी एजंट हे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर चारचाकीत बसून आपले काम करतात.
२ काही जणांची शहराच्या विविध भागात कार्यालये असून, ते सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरच आरटीओ कार्यालयात अंतिम कामासाठी नागरिकांना बोलवतात.
इन्फो...
आरटीओ कार्यालयाचा भूलभुलैया
१ आरटीओ कार्यालय मुळात शहरात दूरवर पंचवटीत एका टोकाला आहेत. त्यामुळे तेथे जाऊन काम न होताच परत माघारी फिरण्याची तयारी नसते.
२ सर्वच शासकीय कार्यालयांतील अनुभव नाशिकच्या आरटीओ कार्यालयात देखील येतो. कोणी जागेवर उपस्थित नाही, तर कोणी गैरहजर, यामुळे इकडे-तिकडे भ्रमंती करावी लागते.
इन्फो...
एजंटांकडून गेले की झटपट आणि विनातक्रार
- आरटीओ कार्यालयात कोणत्याही कामासाठी थेट गेले की, अर्जाच्या पलीकडे काहीच माहिती मिळत नाही.
- एजंट हे शासकीय कर्मचारी असल्यागत वावरत असतात आणि त्यांना कधी कधी तर कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक नियम माहिती असतात.
- एजंटांकडून अर्ज दाखल केला की, चौकशी नाही, क्युरी काढली जात नाही. झटपट अर्ज दाखल करून घेतला जातो.
- सामान्य नागरिकांचे कामाचे अर्ज पटकन पुढे जात नाहीत. मात्र, एजंटांच्या फायली पटकन पुढे जातात.
इन्फो...
एजंटला मागितलेली रक्कम दिली आणि तेव्हाच झाले काम.
सेकंट हँड गाडी खरेदी केल्यानंतर कागदपत्रे नावावर करून घ्यायची होती. मात्र, आरटीओ कार्यालयात नीट माहिती मिळेना. वेगवेगळ्या प्रकारच्या क्युरींमुळे त्रस्त झालो होतो; पण एजंटला काम दिले आणि चटकन झाले.
- एक नागरिक, पंचवटी
कोट..२
गाडीच्या फिटनेससाठी आरटीओत यापूर्वी गेलो तेव्हा नवी स्वयंचलित यंत्रणा वारंवार बंद पडायची. त्यामुळे त्रास हाेत होता. त्यावेळी एजंटकडे काम दिले आणि फिटनेसचे काम पूर्ण झाले.
- एक वाहनचालक, सातपूर