शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

१६ मिनिटांत ‘एटीएम’ फोडून १३ लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:12 IST

जेलरोड शिवाजीनगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडिया एटीएम केंद्रातील मशीन अवघ्या १६ मिनिटांत गॅस कटरने फोडून चोरट्यांनी सुमारे १३ लाखांची रोकड चोरून नेली. इनोव्हा गाडीतून चोरटे पसार झाले असून, चार किंवा त्यापेक्षा जास्त संशयित असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

नाशिकरोड : जेलरोड शिवाजीनगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडिया एटीएम केंद्रातील मशीन अवघ्या १६ मिनिटांत गॅस कटरने फोडून चोरट्यांनी सुमारे १३ लाखांची रोकड चोरून नेली. इनोव्हा गाडीतून चोरटे पसार झाले असून, चार किंवा त्यापेक्षा जास्त संशयित असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेलरोड येथील मंजुळा मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या मंजुळाबाई अपार्टमेंटच्या दर्शनी गाळ्यामध्ये स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. बुधवारी पहाटे ३ वाजून १ मिनिटांनी तोंडाला लाल रूमाल बांधलेला, डोक्यात राखाडी रंगाची टोपी, निळा शर्ट परिधान केलेला सडपातळ व ठेंगणा २८ ते ३० वर्षीय युवक एटीएम केंद्रात आला. चोरट्यांनी एटीएम केंद्रात प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापून टाकल्या. नंतर चोरट्यांनी गॅस कटर मशीनच्या साह्याने एटीएम मशीन (सीएफबीए ००१४६९०९३) चा पुढील पत्रा कापून मशीन उघडले. त्या मशीनमध्ये चार ट्रेमध्ये ठेवलेली १३ लाख ३० हजार ५०० रुपयांची रोकड ट्रे सोबत घेऊन पोबारा केला.एटीएम केंद्र, इमारत व आजूबाजूला व्यवस्थित दिसेल, समजेल असे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करताना एटीएम केंद्रात व बाहेर कितीजण होते याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र शेजारील मंजुळा मंगल कार्यालयाच्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामुळे चोरटे इनोव्हा गाडीतून पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. इनोव्हा गाडी प्रारंभी शिवाजीनगरच्या युनियन बॅँक एटीएम केंद्र, स्टेट बॅँक एटीएम केंद्र येथे काही मिनिटे थांबून थोडी पुढे गेल्यानंतर पुन्हा यू टर्न घेतला. युनियन बॅँक आॅफ इंडियाच्या समोरील बाजूने इनोव्हा गाडीने यू टर्न मारून अवघ्या १६ मिनिटांत काम फत्ते होताच पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी चोरटे इनोव्हा गाडीतून पसार झाले. दरम्यान चोरट्यांनी शिवाजीनगर येथील साईमूर्ती अपार्टमेंटमधील युनियन बॅँकेच्या एटीएम केंद्रातील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरी कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे. सफाई कामगार सूरज ढकोलिया साफसफाई करण्यास आला असता त्याला एटीएम मशीन फोडलेले आढळले. बोडके यांनी इलेक्ट्रॉनिक पेमेंट अ‍ॅन्ड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे मिलिंद काशीनाथ नेहे यांना माहिती देताच काही वेळातच घटनास्थळी पोलीस पोहचले. पोलीस उपायुक्त विजय खरात, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील, ईश्वर वसावे, समीर शेख, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, दिनेश बर्डीकर, कुमार चौधरी, सुधीर डुंबरे आदींसह श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एटीएम मशीन फोडणारे चोरटे किती होते, कुठून आले, कसे गेले, इनोव्हा गाडीचा क्रमांक आदी माहिती शोधण्यासाठी परिसरातील, जेलरोड व टोल नाक्याजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. परंतु निश्चित धागेदोरे हाती न लागल्याने पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी मिलिंद नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एटीएम केंद्रातील मशीनचा पत्रा गॅसकटरने कापल्यानंतर दर्शनी बाजूचे स्क्रीन व कॅमेरा खाली गेल्याने त्यानंतरचे शुटिंग होऊ शकले नाही. मात्र विशेष म्हणजे त्या मशीन शेजारील असलेल्या दुसºया मशीनचे व युनियन बॅँकेतील दोन्ही एटीएम मशीनमधील कॅमेºयाची हार्ड डिस्क करप्ट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे चोरटे कॅमेºयात कैद न झाल्याने पोलिसांच्या तपासात मोठी आडकाठी निर्माण झाली आहे.जेलरोड शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रात व मशीनला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाव्यतिरिक्त कुठलीही सुरक्षेची काळजी व उपाययोजना नसल्याचे उघडकीस आले आहे. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक, अलार्म व एटीएम मशीनला छेडछाड केल्यास एसएमएस सुरक्षा प्रणाली अस्तित्वातच नाही. दहा महिन्यापूर्वी शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेचेच एटीएम फोडून सुमारे २८ लाखांची रोकड चोरून नेण्यात आली होती. तेव्हा देखील एटीएम केंद्र व त्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून बॅँकांना एटीएम केंद्राच्या सुरक्षितेबाबत उपाययोजना व खबरदारी घेण्याचे पत्र देण्यात आले होते.मात्र एटीएम केंद्र रोकडच्या ‘इन्शुरन्समुळे’ बॅँकांनी पोलीस प्रशासनाच्या सुचनेला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्याचे पुन्हा या घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.जुन्या घटनांना उजाळानाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे ११ आॅक्टोबर २०१८ ला रात्री अशाच पद्धतीने गॅसकटरचा वापर करून एटीएम मशीन फोडून २८ लाख रुपये चोरून नेले होते. त्यानंतर तीन महिन्यांनी पोलिसांनी १० जानेवारी २०१९ रोजी हरियाणामधील दोन व गुजराथमधील एक अशा तीन चोरट्यांना अटक केली होती. मात्र यामध्ये चोरट्यांकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात यश आले नव्हते.चोरटे परराज्यातील असण्याची शक्यताजेलरोड येथील एटीएम केंद्रात ज्या पद्धतीने चोरी झाली आहे त्यावरून चोरटे परराज्यातील असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे. एटीएम केंद्र व जागेची व्यवस्थित रेकी करून अवघ्या १५ ते १७ मिनिटांत अत्यंत चलाखीने सर्व खबरदारी घेत एटीएम केंद्र फोडून १३ लाखांची रोकड घेऊन सहीसलामत पळून गेले. शहरात यापूर्वी झालेल्या एटीएम फोडीत परराज्यातील चोरट्यांचा समावेश होता.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीatmएटीएमtheftचोरी