वाहतूक शाखेला सुचले शहाणपण

By Admin | Updated: August 25, 2015 23:46 IST2015-08-25T23:45:46+5:302015-08-25T23:46:20+5:30

तपोवन साधुग्राम : रिक्षाचालकांची दबंगगिरी

Wise wisdom on the traffic branch | वाहतूक शाखेला सुचले शहाणपण

वाहतूक शाखेला सुचले शहाणपण

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ झाल्यानंतर दैनंदिन शेकडो भाविक तपोवन साधुग्राममध्ये साधू-महंतांच्या देवदर्शनासाठी, तसेच तपोवन फिरण्यासाठी दाखल होत आहेत. रविवारच्या दिवशी, तर भाविकांनी तपोवनात तोबा गर्दी केल्याने संपूर्ण तपोवन परिसरात एकच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसले. वाहतूक कोंडी करण्याचे काम प्रामुख्याने शहरातील रिक्षाचालकांनीच केल्याची कबुली खुद्द पोलीस प्रशासनाने दिली आहे. खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना शह देत काही रिक्षाचालकांनी, तर थेट चालकाच्या आसनशेजारी दोन ते तीन प्रवासी बिनधास्तपणे बसवून पोलिसांवरच दबंगिरी केल्याची चर्चा आता रंगली आहे.
रविवारच्या दिवशी तपोवनात वाहतुकीची कोंडी झाली असली तरी, बोटावर मोजण्या इतकेच वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या डोळ्यादेखत रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे चित्र असतानाही त्या कर्मचाऱ्यांनी डोळेझाक करून एकप्रकारे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करण्यासाठी जणू रिक्षाचालकांनाच एकप्रकारे मुभा दिल्याचे दिसून आले.
वाहतूक शाखेला सोमवारी उशिरा शहाणपण सुचले आणि ‘वरातीमागून घोडे’ या म्हणीप्रमाणे वाहतूक शाखेने सोमवारी सायंकाळी साधुग्राममध्ये रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे मान्य करत साधुग्राम कार्यालय (रामानुजाचार्य प्रवेशद्वाराकडून) चालकांना रिक्षा नेण्यास बंदी घातली. ज्या दिवशी भाविकांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली होती. रिक्षाचालकांना प्रवेशबंदी करण्यापेक्षा वाहतूक शाखेने सोमवारच्या दिवशी रिक्षांना तपोवनात प्रवासी घेऊन जाण्यास बंदी केल्याने वाहतूक शाखेच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालक-शिक्षक संघाची निवड
नाशिकरोड : लहवित येथील जनता विद्यालय पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष मुख्याध्यापक मृणाल पेखळे, उपाध्यक्ष- संजय गायकवाड, सचिव- एस. जी. थेटे, सहसचिव- मधुकर शिंदे, दिलीप जारस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Web Title: Wise wisdom on the traffic branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.