शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

साकोरा परिसरात विज, वारेवादळासह बेमोसमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:39 IST

साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल्याने तब्बल चार गावातील नागरिकांच्या झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचार गावांत अंधाराचे साम्राज्य ; बोराळे परिसरात शेतमालाचे नुकसान

साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल्याने तब्बल चार गावातील नागरिकांच्या झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.नांदगाव तालुक्याला कायमचा दुष्काळ पुजलेला असतांना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंतीची वेळ आली असतांना चार दिवसांपासून प्रचंड उकाड्याने ञस्त नागरिकांना काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह धुळीचे लोट पाहून पावसाळ्याची चाहूल झाल्यागत झाले होते. साकोरा, वेहळगांव, पांझण, जामदरी, कळमदरी, बाभुळवाडी, डाक्टरवाडी आदि गावात वादळाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने जनावरांसाठी विकत घेतलेला चारा झाकण्यासाठी शेतकर्यांची चांगलीच धावपळ उडाली. साकोरा, वेहळगांव, पांझण आण िबाभुळवाडी गावांना पिंपरखेड 132 के. व्ही स्टेशनवरून विजपूरवठा जोडला आहे. त्यात वेहळगांव आण िसाकोरा येथे उपसप्टेशन असून त्यावर पांझण वाटरसप्लायचा पुरवठा जोडला आहे. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे एखाद्या झाडावर फांदी पडल्याने तब्बल एकोणीस तास विजपूरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विरल चारही गावातील नागरिकांना रात्रभर अंधारात बसावे लागल्याने झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तसेच गिरणाडॅम धरणाच्या पाण्यावर आधारीत शेतजमिनीतील काढलेला हजारो क्विंटल कांदा भिजला. दुष्काळ आण ि त्यात बेमोसमी पावसाने हजारो रु पयाचा विकत घेतलेला चारा व कांदा, सोयाबीन कुटी, गवताच्या गाठी, मक्याची कुटी तसेच केळीचे खांब, हजारो रु पये खर्च करून घेतलेला चारा अचानक आलेल्या बेमोसमी पाऊसमुळे झाकायला कोणतेही साधन नसल्यामुळे भिजले.गिरणाडॅम परिसरातील आमोदे, बोराळे, मळगाव, कळमदरी, परिसरातील हजारो क्विंटल उन्हाळ कांदा काढून पोहळ घातलेल्या होत्या. अचानक आलेल्या या बेमोसमी पावसामुळे पूर्ण कांदा ओला झाला. काढणीला आलेला कांदा सुद्धा या पावसामुळे खराब होण्याची भीती शेतकर्याला आता वाटू लागली आहे.आठ एकरचा अंदाजे १५०० क्विंटल काढलेल्या कांद्याच्या ३० पोअळा शेतात पडलेला होता. दोन दिवसात चाळीत भरणार होतो. परंतु अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व जोराच्या हवेमुळे कांदा झाकता आला नाही. झाकायला गेल्यावर ताडपत्र्या दूरवर उडत होत्या. विजेच्या कडकडाटामुळे जीव सांभाळावा का शेतात पिकलेला कांदा सांभाळावा, अशी वेळ आमच्यावर आली होती. त्यामध्ये पूर्ण कांदा भिजला आहे.- भिलासाहेब राजपूत (शेतकरी)बोराळे, ता. नांदगाव.गेल्या कित्येक वर्षांपासून केळीचे उत्पन्न घेत असून यावेळी आलेल्या अवकाळी वादळासह पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.- दादाभाऊ सोळूंके. (शेतकरी)बोराळे, ता. नांदगाव.