कामगार पॅनलचा दणदणीत विजय
By Admin | Updated: October 11, 2015 00:13 IST2015-10-11T00:12:56+5:302015-10-11T00:13:19+5:30
सर्व जागा जिंकल्या : सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज सोसायटी निवडणूक

कामगार पॅनलचा दणदणीत विजय
नाशिकरोड : इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को-आॅप. सोसायटीच्या शनिवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्वच्या सर्व ११ जागांवर दणदणीत विजय संपादन करून आपला पॅनलचा धुव्वा उडविला.
इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को-आॅपरेटीव सोसायटीवर स्थापना झाल्यापासुन गेल्या ५६ वर्षापासून कामगार पॅनलची एकहाती सत्ता आहे. सर्वसाधारण गट -६ जागा, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, भटक्या जमाती प्रत्येकी १ जागा व महिला राखीव २ जागा अशा एकूण ११ जागांसाठी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानात ३०६७ मतदारांपैकी २९६९ (९६ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीमध्ये पहिल्यापासून कामगार पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते.
सोसायटीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटाच्या सहा जागांमध्ये जगदीश गोडसे (१८८८), ज्ञानेश्वर जुंद्रे (१८६५) रमेश जाधव (१७१७), भगवान मोरे (१३१६) गणेश काळे (१५९२), राजेंद्र चंद्रमोरे (१५८५), महिला राखीव दोन जागा - सुनंदा कडाळे (१३९७), मंगला खर्जुल (१४२०), इतर मागास प्रवर्ग- साहेबराव गाडेकर (१७५४), अनुसूचित जाती-जमाती - संदीप गांगुर्डे (१७३१), विमुक्त जाती-भटक्या जमाती- हिरामण आव्हाड (१७७४) मते मिळवून विजयी झाले, तर आपला पॅनलचे रामभाऊ जगताप (११३८), हरिभाऊ ढिकले (११८५), निवृत्ती ताजनपुरे (९४६), सतीश निकम (१०२४), किसन बोराडे (९५७), देवीदास साळवे (८००), सुनील ढगे (१११४), कृष्णा चंद्रमोरे (११३२), गोकूळ काकड (१०८०), नंदा उखाडे (७६०), सुनंदा गांगुर्डे (८५३) मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश सानप यांनी काम बघितले. (प्रतिनिधी)