वकील संघ अध्यक्षपदी पगार विजयी
By Admin | Updated: July 23, 2014 00:33 IST2014-07-22T22:04:12+5:302014-07-23T00:33:23+5:30
निवडणूक : उपाध्यक्षपदी राहुल दराडे, सचिवपदी योगेश गडाख विजयी

वकील संघ अध्यक्षपदी पगार विजयी
सिन्नर : येथील वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. विलास पगार, उपाध्यक्षपदी राहुल दराडे, तर सचिवपदी योगेश गडाख विजयी झाले.
येथील ९८ मतदार असलेल्या वकील संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत वकील संघाच्या ९२ सदस्य मतदारांनी हक्क बजवाला. अध्यक्षपदासाठी अॅड. पगार व अॅड. पी. आर. कोकाटे व प्रभाकर देशमुख यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. त्यात अॅड. विलास पगार ४९ मते मिळवून १४ मतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत झाली. त्यात राहुल दराडे ५३ मते मिळवून विजयी झाले. सचिवपदासाठी दुरंगीच लढत रंगली. त्यात योगेश गडाख यांनी ५४ मते मिळवत विजय मिळविला, तर खजिनदारपदी यापूर्वी देवेंद्र खरात हे बिनविरोध निवडून आले आहे.
तसेच सदस्यपदासाठीही शरद चतूर, विलास खैरानार, अजित कोकाटे, सुशील सांगळे, संदेश शिंदे,
अनिल पालवे, स्वाती मोरे यांचीही यापूर्वीच बिनविरोध निवड
झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरीष बर्वे, शिवराज नवले यांनी काम पाहिले. तर निवडणूक प्रक्रिया शिवाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवडणुकीमुळे बार असोसिएशनची सूत्रे पुढील तीन वर्षांसाठी तरुणांच्या हाती आली असून, सर्व विजयी वकिलांचे स्वागत होत आहे. (वार्ताहर)