द्राक्ष बागाईतदारांना वाइनरींचा हात

By Admin | Updated: March 10, 2015 22:41 IST2015-03-10T22:41:44+5:302015-03-10T22:41:59+5:30

पिकाचे नुकसान : व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

Winery of grape gardeners | द्राक्ष बागाईतदारांना वाइनरींचा हात

द्राक्ष बागाईतदारांना वाइनरींचा हात

वरखेडा : गेल्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातक्षम व स्थानिक बाजारपेठेतील द्राक्ष उत्पादक पुरता खचून गेला असताना, व्यापारीवर्गाने नाकारलेल्या द्राक्ष बागाईतदारांना सुला वाइन्सने मदतीचा हात दिला असून, मोठ्या प्रमाणात द्राक्ष खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. द्राक्ष बागाईतदारदेखील वाइनरीसाठी द्राक्षे देण्यास तयार झाले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी) येथील सुला वाइन्स येथे आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार मंदार कुलकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील, पंचायत समिती उपसभापती भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे व सुला वाइन्सचे अ‍ॅग्रीकल्चर जनरल मॅनेजर नानासाहेब शेळके यांच्या समवेत द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये द्राक्ष उत्पादकांनी बेमोसमी पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेल्याने निर्यातक्षम द्राक्ष व त्याचप्रमाणे देशांतर्गत द्राक्षांना व्यापारीवर्गाने नाकारल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. व्यापारीवर्गाने बाजारभावापेक्षा कमी दराने द्राक्षे खरेदी केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेदाणे निर्मितीसाठीदेखील खरेदी होत नसताना अखेर वाइनरीसाठी द्राक्षांची खरेदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रमाणे सुला वाइन्सच्या वतीने तडे गेलेले द्राक्ष खरेदी करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी सुला वाइन्सचे प्रशांत क्षत्रिय, महेश भाईबंद, पोलीसपाटील राजेंद्र पाटील, बापू पाटील, परिसरातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागाईतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Winery of grape gardeners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.