नागमोडी वळणे अन् उंचवट्यांवर रविवारी रंगणार थरार

By Admin | Updated: May 14, 2014 22:33 IST2014-05-14T19:16:25+5:302014-05-14T22:33:48+5:30

नाशिककरांना संधी : एमआरएफ सुपरक्रॉस मोटारसायकल राष्ट्रीय चॅम्पियनशिप

On the windy turf and lofty hills will shine on Sunday | नागमोडी वळणे अन् उंचवट्यांवर रविवारी रंगणार थरार

नागमोडी वळणे अन् उंचवट्यांवर रविवारी रंगणार थरार

नाशिककरांना संधी : एमआरएफ सुपरक्रॉस मोटारसायकल राष्ट्रीय चॅम्पियनशिप
नाशिक : शहरातील अनेक रस्त्यांवर मोटारसायकलवर कसरती करताना युवक नेहमीच दिसत असले, तरी येत्या १७ व १८ तारखेला अत्यंत नागमोडी वळणाच्या वेड्यावाकड्या आणि उंचवट्यांच्या रस्त्यांवरची एमआरएफ सुपरक्रॉस राष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेचा थरार नाशिककरांना अनुभवता येणार आहे. सदर स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित स्पर्धक सहभागी होत असून, यात पहिल्यांदाच १५ वर्षांखालील दुचाकीचालकांचा गटही सहभागी होणार आहे.
एमआरएफ व गॉडस्पीड यांच्या वतीने नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (नासा) सदरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा रविवारी दुपारी २ वाजता पाथर्डी गावालगतच्या गौळाणे येथील कुटेज् सुपरक्रॉस ट्रॅकवर रंगणार असून, त्यापूर्वी शनिवारीही सरावाचे प्रदर्शन असणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून प्रवेशिका दाखल झाल्या असून, यात नाशिकसह पुणे, मंुबई, औरंगाबाद, नागपूर, नवी दिल्ली, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, बंगळुरूचे नामांकित स्पर्धक सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेचा नाशकात होणारा हा पहिला टप्पा असेल, तर दुसर्‍या टप्प्याची स्पर्धा पुण्यात रंगणार आहे. पत्रकार परिषदेला नासाचे सरचिटणीस मनीष चिटको, गॉडस्पीडचे श्याम कोठारी, युवराज पवार, सूरज कुटे आदि उपस्थित होते.
असे आहेत स्पर्धेतील गट
फॉरेन ओपन क्लास, प्रायव्हेट फॉरेन ओपन क्लास, इंडियन एक्सपर्ट क्लास, इंडियन एक्सपर्ट क्लास, प्रायव्हेट एक्सपर्ट क्लास, नोव्हीक क्लास आणि ज्युनिअर क्लास असे सात गट आहेत. त्याचप्रमाणे १५ वयोगटातील मुलांसाठी २६० सीसीपर्यंतच्या मोटारसायकलच्या प्रदर्शनीय स्पर्धेचाही यात समावेश आहे.
शनिवारी सरावाचे प्रदर्शन
मुख्य स्पर्धा रविवारी दुपारी २ वाजता होणार असून, त्यापूर्वी प्रत्यक्ष ट्रॅकवर स्पर्धेतील सहभागी चालकांना शनिवारी सराव करता येणार आहे. प्रत्यक्ष स्पर्धेप्रमाणेच सरावाची तयारी स्पर्धक करणार असल्याने ते पाहण्याची संधीही नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.
अरविंद, नोहा असतील आकर्षण
गतस्पर्धेतील विजेते बंगळुरूचा के. पी. अरविंद, केरळचा हॅरिथ नोहा व बंगळुरूचा सी. एस. संतोष हे सदर स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. भरधाव वेगात कसरती करीत दुचाकी चालविणार्‍या या चालकांचा नाशकात मोठा प्रशंसक वर्ग आहे.

Web Title: On the windy turf and lofty hills will shine on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.