छावणी परिषदेच्या निवडणूकीत रिपाइं उमेदवारांना विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST2021-08-21T04:19:15+5:302021-08-21T04:19:15+5:30

शुक्रवारी (दि.२०) वडनेर रोडवरील त्रिमूर्ती चौक येथे भीमस्तंभाचे लोकार्पण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ...

Win the Ripai candidates in the Camp Council elections | छावणी परिषदेच्या निवडणूकीत रिपाइं उमेदवारांना विजयी करा

छावणी परिषदेच्या निवडणूकीत रिपाइं उमेदवारांना विजयी करा

शुक्रवारी (दि.२०) वडनेर रोडवरील त्रिमूर्ती चौक येथे भीमस्तंभाचे लोकार्पण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, श्रीकांत भालेराव, अर्जुन पगारे, अमोल पगारे, शांताराम बागुल उपस्थित होते.

यावेळी छावणी परिषदेच्या दवाखान्यात कोरोनाकाळात सेवा करणारे डॉ. नरेश दौलतानी, विक्रम सोनवणे, पो. हवालदार सुगंध साबरे, पत्रकार सुधाकर गोडसे, परिचारिका सुरेखा माळोदे आदींचा कोरोनायोद्धा म्हणून आठवलेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संतोष गायकवाड, शिवराज मोरे, रवि गांगुर्डे, भूषण गव्हाणे, दुष्यंत पगारे, आकाश सावंत, कुणाल काळे, विशाल काळे, सुरेश निकम उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर आठवले पहिल्यांदा देवळालीत आल्याने विविध ठिकाणी फटाखे फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. जुने बसस्थानक येथील रिपाइं शाखा फलकाचे अनावरण आठवलेंच्या हस्ते करण्यात आले. आठवले यांनी छावणी परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक स्व. दिनकर आढाव यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान लक्षात घेऊन वडनेर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी भेट देत आदरांजली वाहिली. यावेळी प्रीतम आढाव, डॉ. रीना गायकवाड, सोनी आढाव, दक्षता आढाव, वसुधा आढाव, रिवाना गायकवाड, विक्रांत चांदवडकर, मोनीष दोंदे, संजय भालेराव, राहुल चौधरी, निखिल सातपुते आदी उपस्थित होते. (फोटो २० कॅम्प)

Web Title: Win the Ripai candidates in the Camp Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.