शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का?

By suyog.joshi | Updated: April 6, 2024 09:55 IST

येत्या ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

नाशिक, सुयोग जोशी: एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे चटके जाणवत असताना लोकसभेची नाशिकची जागाही आता राज्यात ‘हॉट’ ठरू लागली आहे. महाविकास आघाडीने उद्धवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा करत बाजी मारली असतांना महायुतीकडून खासदार हेमंत गोडसे की अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाचे नाव जाहीर होते याकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच येत्या ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

कारण, मनसेच्या ट्विटर हँडलवरून गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये ‘नक्की काय घडलंय, काय घडतंय’ हे प्रत्यक्ष राज ठाकरे सांगणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय अभ्यासकांबरोबरच सर्वांच्याच नजरा त्या सभेकडे लागून आहे. सभेत मोठे खुलासे राज ठाकरे करणार असल्याचे टिझरवरून दिसत आहे.

एकीकडे महायुतीतील जागेवरून वादंग सुरू असतानाच दुसरीकडे मनसेनेही लोकसभेच्या नाशिक मतदारसंघावर दावा सांगितला असला, तरी मनसे कोणता उमेदवार आखाड्यात उभा करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिक व दक्षिण मुंबईतील जागा मिळावी, अशी मनसेची मागणी असल्याची चर्चा असतांनाच नाशिकमध्ये खुद्द राज किंवा अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा मनसे कार्यकर्त्यांचा सूर आहे. याबाबत तसे पत्रही मनसे कार्यकर्त्यांनी राज यांना मध्यंतरी पाठवले होते. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार का? स्वतंत्र लढणार? की लोकसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार यासाठी गुढीपाडव्याच्या मेळाव्याची वाट पाहावी लागणार आहे.नक्की काय घडलंय, काय घडतंय!

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा टिझर लॅान्च केला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय ..हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. अशा ओळीसह राज यांनी मेळाव्याचा टिझर पोस्ट केला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे – भाजप युती होईल अशी चर्चा होती व ती अजूनही राजकीय गोटात दबक्या आवाजात सुरू आहे.वर्धापनदिनीही संयमाचे आवाहन

मनसेने यंदा वर्धापनदिनाचा मान नाशिकला दिला. त्यामुळे या मेळाव्यात तरी राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत घोषणा करतील, असे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वाटत होते. परंतु प्रत्यक्षात तशी कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे आता गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४