राज यांच्या उताऱ्याने मनसे गटबाजीच्या शापातून मुक्त होईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST2021-09-26T04:17:02+5:302021-09-26T04:17:02+5:30
गेल्या दाेन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात अधिक लक्ष घातले आणि त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती समोर ...

राज यांच्या उताऱ्याने मनसे गटबाजीच्या शापातून मुक्त होईल?
गेल्या दाेन महिन्यांपासून राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणात अधिक लक्ष घातले आणि त्यातून जी फलनिष्पत्ती झाली ती समोर आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोडून मनसेत जाणाऱ्या दिलीप दातीर यांनी पराभव पत्करावा लागला.त्यांच्याच नगरसेवकपदाच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही ते पराभूत झाले परंतु पक्षात मात्र त्यांनी जम बसवला. त्यांना आधी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि ती बदलून शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अशोक मुर्तडक यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या अनंता सूर्यवंशी यांना जबाबदारी मुक्त करून प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांच्याकडे त्यांच्याकडील जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच ही पदोन्नती की पदावनती याविषयी देखील शंका आहे. बरे तर जिल्हाध्यक्षपद मोठे पण त्या तुलनेत जिल्ह्यात मनसेचा प्रभाव कोठे आहे तर तो कोठे दिसत नाही. मग दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त करून काय करणार? साऱ्यांचे लक्ष शहरावर असते; मात्र चाळीसवरून पाच नगरसेवक आलेल्या पक्षाची स्थिती नाशिक शहरातही चांगली आहे, असेही नाही. त्यातच
सध्या पक्षाचे सुकाणू ज्यांच्या हाती आहेत, त्यातील एक दरबारी राजकारणी तर दुसराधी, दोघांची दोन दिशेला तोंडे असतील तर पक्ष कसा वाढेल?
इन्फो...
निवडणुकीच्या तोंडावर का होईना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे राज ठाकरे यांनी लक्ष पुरवले हे चांगलेच झाले. शाखाध्यक्ष, आता गटाध्यक्ष अशी पदे करून राज हे पक्षात जोश भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांत आशेचा किरण दिसत असतानाच तीन सदस्यीय प्रभाग पद्धती तयार झाली असून ती पक्षाला अडचणीची असल्याचे राज यांच्याच भूमिकेवरून स्पष्ट दिसते आहे.
- संजय पाठक