‘समृद्धी’ महामार्गावर सेनेची भूमिका ठरणार
By Admin | Updated: May 18, 2017 18:12 IST2017-05-18T18:12:20+5:302017-05-18T18:12:20+5:30
बैठक : प्रकल्प विरोधाची घोषणा शक्य

‘समृद्धी’ महामार्गावर सेनेची भूमिका ठरणार
नाशिक : शेतकऱ्यांसोबत शिवसेना कायम असल्याचे सांगणारे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हेच समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे चेअरमन असून, शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला असलेला विरोध लक्षात घेता शिवसेनेच्या शुक्रवारच्या कृषी अधिवेशनात यासंदर्भातील भूमिका ठरण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समृद्धी प्रकल्पाला विरोध दर्शविणाऱ्या संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकाळी चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.