शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार? : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:08 IST

निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने द्यायची, मतदारांच्या भावनांशी खेळून सत्ता हस्तगत करायची व सत्तेवर आले की, सारे विसरून जायचे अशाप्रकारे भाजपाने देशाची व राज्याची सत्ता हस्तगत केली असून, त्याच धर्तीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीला मोदी-शहा सामोरे जात आहेत.

नाशिक : निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने द्यायची, मतदारांच्या भावनांशी खेळून सत्ता हस्तगत करायची व सत्तेवर आले की, सारे विसरून जायचे अशाप्रकारे भाजपाने देशाची व राज्याची सत्ता हस्तगत केली असून, त्याच धर्तीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीला मोदी-शहा सामोरे जात आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार हे ठरविणारी ही निवडणूक असून, जनतेने हुरळून न जाता मोदी व शहा यांच्यातील सत्तेचा माज उतरावा, असे आवाहन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.येथील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेऊन ‘ए लाव रे व्हिडीओ’ ने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली असताना नाशिकच्या सभेतून त्याची सांगता करण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी राज्यात अन्य ठिकाणी दाखविलेले सर्व व्हिडीओ पुन्हा दाखवून मोदी व शहा यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते पुढे म्हणाले, निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व उमेदवारांकडून जे आश्वासने दिली जातात त्याची पूर्तता होईल म्हणून मतदार रांगेत उभे राहून मतदान करून निवडून पाठवितात. लोकांची गरज मुलभूत सोयी, सुविधा मिळाव्यात इतक्याच असतात परंतु पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी शेतकरी, बेरोजगार, महिला, नोकरदार अशा सर्वच घटकांना मोठी मोठी आश्वासने दिली. कांद्याचा प्रश्नावर बोलताना आपले सरकार सत्तेवर आल्यास शेतीविषयक धोरण बदलेल, असे मोदी यांनी आश्वासन दिले होते. परंतु यापैकी एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला. महाराष्टÑात युती सरकारच्या काळात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांचा अपमान करणारे विधाने करतात. शेतकºयांच्या आत्महत्या फॅशन झाली आहे, असे सांगून सत्तेचा माज दाखवित आहेत. शेतीची होत असलेली वाताहत पाहून शेतकºयांची मुले शेती करायला नाही म्हणू लागली आहेत. अशा मुलांसाठी शहरात नोकºया तरी कोठे आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, मनसे गटनेता सलीम शेख यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी केले.  राज्याच्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ठाकरे यांनी इगतपुरी-त्र्यंबकच्या सीमेवरील बर्फ्याची वाडी या आदिवासी गावातील महिलांची पाण्यासाठी विहिरीत उतरून सुरू असलेल्या धडपडीचा व्हिडीओ दाखवून विद्यमान सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक लाख २० हजार विहिरी बांधल्याचे जाहीर केले. जर इतक्या मोठ्या प्रमाणात विहिरी बांधल्या तर राज्यातील ३९ हजार गावांमध्ये दुष्काळ का जाहीर करावा लागला? असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात पाटबंधारे खात्याच्या कामांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे भाजपा ओरडत होती, मग साडेचार वर्षे उलटूनही फडणवीस हे पाटबंधारे खात्याच्या गैरव्यवहारावर का बोलत नाही? पवार, तटकरे यांच्यावर काय कारवाई केली? छगन भुजबळ यांना आत टाकले पुढे काय झाले? या प्रश्नावर आता कोणीच का बोलत नाही, अशी विचारणाही ठाकरे यांनी शेवटी केली.काय केलं दत्तक बापाने, फडणविसांवर टीकानाशिकमध्ये सभा होत असताना राज ठाकरे यांनी अपेक्षेनुरूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दत्तक’ घेण्याच्या विषयाला हात घातला. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार करताना फडणवीस यांनी एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो असे म्हटले होते. त्याचा व्हिडीओच लावला. काय केलं या दत्तक बापाने? असा प्रश्न केला. नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश केला, त्यात मनसेची कामे घुसवली, असेही ते म्हणाले.नाशिककरांच्या कौलाविषयी दु:ख कायम...अनेक पक्ष जाहिरनाम्यात कामे करण्याचे स्वप्न दाखवून ती करीत नाहीत. मात्र, मनसेने नाशिक महापालिकेत सत्ता असताना जाहिरनाम्यात जी कामे सांगितली नव्हती तीदेखील केली, देशात प्रथमच टाटा, महिंद्रा, जीव्हीके या कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा वापर करून विकास करण्यात आला, असे सांगून राज यांनी नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचा व्हिडीओदेखील दाखवला. जी कामे केली तीच छातीठोकपणे सांगितली. परंतु नाशिककरांनी (विरोधात) निर्णय दिला. त्याचे आजही दु:ख वाटते, असे राज यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी