‘वन्यजीव सप्ताह’निमित्त चित्रकला स्पर्धा

By Admin | Updated: October 11, 2015 22:28 IST2015-10-11T22:27:36+5:302015-10-11T22:28:21+5:30

‘वन्यजीव सप्ताह’निमित्त चित्रकला स्पर्धा

'Wildlife Week' specialty painting competition | ‘वन्यजीव सप्ताह’निमित्त चित्रकला स्पर्धा

‘वन्यजीव सप्ताह’निमित्त चित्रकला स्पर्धा

नाशिक : वन्यजीव सप्ताहनिमित्त वनविभाच्या वतीने नाशिक वनवृत्तातील राज्यस्तरीय, वृत्तस्तरीय तसेच जिल्हास्तरावर निबंध-चित्रकला-निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
उंटवाडी येथील वनविभागाच्या सभागृहात झालेल्या स्पर्धांमध्ये शाळा, माध्यमिक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील, पक्षिमित्र अनिल माळी आदि मान्यवर उपस्थित
होते.
जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत शालेय गटात मयुरी पाटील (प्रथम), विशाल चौधरी (द्वितीय), माध्यमिक गटात लालचंद भुसारे (प्रथम), आशिष बागुल (द्वितीय), पद्मा मौळे (तृतीय), महाविद्यालयीन गटात सचिन पागी (प्रथम), भरत चौधरी (द्वितीय), अनिता शिरसाठ (तृतीय), चित्रकला स्पर्धेत शालेय गटात अंजली निंबारे (प्रथम), राणी माळे (द्वितीय), दर्शना गोराळे (तृतीय), माधुरी राथड (प्रथम), ऋतुजा आव्हाड (द्वितीय), वंदना चौधरी (तृतीय) माध्यमिक गटात अर्चना राऊत (प्रथम), प्रिन्स अ‍ॅन्जोलो (द्वितीय), तुषार माळगावे (तृतीय) महाविद्यालयीन गटात सुरेश राथड (प्रथम), सुरज निकुळे (द्वितीय), देवदत्त अवतार (तृतीय) यांना प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: 'Wildlife Week' specialty painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.