मंुबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्यावर रिक्षांमधील जीवघेणी वाहतूक सुरूच

By Admin | Updated: May 25, 2014 20:36 IST2014-05-25T20:33:53+5:302014-05-25T20:36:53+5:30

इंदिरानगर : मुंबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्यावरील रिक्षातून होणारी जीवघेणी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे़ ही अवैध रिक्षा वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे़

Wildlife traffic in Ranchi on Mahabai Naka from Pathribi Phata parallel road | मंुबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्यावर रिक्षांमधील जीवघेणी वाहतूक सुरूच

मंुबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्यावर रिक्षांमधील जीवघेणी वाहतूक सुरूच

इंदिरानगर : मुंबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्यावरील रिक्षातून होणारी जीवघेणी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे़ ही अवैध रिक्षा वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे़
मुंबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्याजवळच दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, कमोदनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, वासननगरसह विविध उपनगरे आहेत़ याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर दादासाहेब फ ाळके स्मारकाकडे जाता येते़ या ठिकाणी भेट देणारे पर्यटक बस तसेच रिक्षासेवेचा लाभ घेतात़ त्यातही बसफे र्‍यांच्या कमी संख्येमुळे सर्वात जास्त भर प्रवासी रिक्षांवर असतो़
या समांतर रस्त्यावर सुमारे साठ ते सत्तर रिक्षाचालक व्यवसाय करीत असून, त्यापैकी काही रिक्षाचालक हे मागील सीटवर पाच, तर चालकाशेजारी दोन्ही बाजूने दोन-दोन अशी सुमारे नऊ प्रवाशांची वाहतूक करतात़ चालक धरून केवळ चारच प्रवाशांची वाहतूक करण्याच्या नियमाकडे अक्षरश: दुर्लक्ष करून तुफ ान वेगाने रिक्षा या मार्गावर धावतात़ रिक्षाचालकांच्या या मनमानी प्रकाराचा फ टका अनेकदा प्रवाशांना बसून रिक्षांना अपघात होण्याचे प्रकारही घडलेले आहेत़
मुंबई नाका या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मुख्य वाहतूक कार्यालयापासून हा प्रकार होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़, तसेच पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधांशिवाय हा प्रकार होणे शक्य नसल्याचेही बोलले जाते़ (वार्ताहर)

Web Title: Wildlife traffic in Ranchi on Mahabai Naka from Pathribi Phata parallel road