अपघातातील जखमी विकी दाहिजेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 23:14 IST2016-01-25T23:13:52+5:302016-01-25T23:14:29+5:30

अपघातातील जखमी विकी दाहिजेचा मृत्यू

Wiki kills the injured in an accident | अपघातातील जखमी विकी दाहिजेचा मृत्यू

अपघातातील जखमी विकी दाहिजेचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी रोडवरील पिंपळणारे फाट्यावर स्विफ्ट कारने लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील गंभीर जखमी विकी मधुकर दाहिजे (२२, आम्रपाली झोपडपट्टी) या तरुणाचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
रविवारी सायंकाळच्या सुमारास नितीन जाधव, गोरख ठोंबरे, विकी दाहिजे, आसाराम ढाकणे हे स्विफ्ट कारने (एमएच १५, सीटी ५९००) वणीहून नाशिकला येत होते़ साडेसात वाजेच्या सुमारास पिंपळणारे फाट्यावर नाशिककडे लोखंडी सळया (स्टिल) घेऊन जाणाऱ्या ट्रकवर ही भरधाव स्विफ्ट कार पाठीमागून धडकली़ या अपघातात मनसे नगरसेवक माधुरी जाधव यांचे दीर नितीन जाधव व गोरख ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर विकी दाहिजे व आसाराम ढाकणे हे दोघे गंभीर जखमी झाले होते़ या दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास विकी दाहिजे याचा मृत्यू झाला़ तर जखमी आसाराम ढाकणे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Wiki kills the injured in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.