चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:44 PM2020-01-29T22:44:05+5:302020-01-30T00:12:49+5:30

शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीची कुºहाडीने हत्या करत नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा चारित्र्याच्या संशयाने खून करत नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Wife murdered on suspicion of assault | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

Next
ठळक मुद्देचांदवड : पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

चांदवड : दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीची कुºहाडीने हत्या करत नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा चारित्र्याच्या संशयाने खून करत नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मृत परिचारिकेचा भाचा उमेश राजाराम हिंगले व तिचा लहान मुलगा अमोल जाधव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या चार -पाच महिन्यांपूर्वी बदली होऊन आलेल्या परिचारिका अनिता अण्णा जाधव (४०) उपजिल्हा रुग्णालयाच्या आवरातील राहत. नेहमीच त्यांच्यात अशी भांडणे होतात म्हणून उमेश व अमोल दोघेही रात्री झोपून गेले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर दरवाजा बंद असल्याने त्यांनी दरवाजा तोडून दुसºया खोलीत बघितले तर मावशी अनिता हिचा धारदार शस्राने खून झाला. अण्णा जाधव यांनी स्वयंपाक घरात गॅस टाकी ठेवून तिचावर उभे राहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना उमेश व अमोल यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांना कळविले. त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, पोलीस कर्मचारी आले. त्यांनी दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांच्या नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.
मृत अनिता व अण्णा यांचा दुसरा विवाह असल्याचे समजते तर अण्णा यास पहिल्या पत्नीपासून दोन अपत्य मोठा ज्ञानेश्वर सध्या तो मालेगाव येथे अकरावीत तर लहान मुलगा अमोल आहे, असे सांगण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना केल्यात.
अण्णा शिवराम जाधव व अनिता यांच्यात नेहमीच चारित्र्याच्या संशयावरून वाद होत असे. मंगळवारी (दि. २८) जेवण झाल्यानंतर निवासस्थानातील दुसºया खोलीत गेले असता रात्री १ वाजेच्या सुमारास त्या दांपत्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. अमोलने खिडकीतून खूप आवाज दिले मात्र दार बंद असल्याने ते उघडले नाही. नेहमीच त्यांच्यात अशी भांडणे होत. त्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Wife murdered on suspicion of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.