गॅस सिलिंडरमध्ये ग्राहकांची सर्रासपणे लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST2020-12-29T04:13:01+5:302020-12-29T04:13:01+5:30

नाशिक शहरात अनेक गॅस वितरक असून, त्यांच्याकडून घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना डिलिव्हरी बॉयकडून घरपोच सिलिंडर पुरविण्याचे काम केले जाते. ...

Widespread robbery of customers in gas cylinders | गॅस सिलिंडरमध्ये ग्राहकांची सर्रासपणे लूट

गॅस सिलिंडरमध्ये ग्राहकांची सर्रासपणे लूट

नाशिक शहरात अनेक गॅस वितरक असून, त्यांच्याकडून घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना डिलिव्हरी बॉयकडून घरपोच सिलिंडर पुरविण्याचे काम केले जाते. सध्या घरगुती सिलिंडरची मूळ किंमत ६९८ रुपये आहे, तर संबंधित डिलिव्हरी बॉय सदर ग्राहकांना सिलिंडर पोहोचविल्यानंतर त्यांच्याकडून ७१० रुपये आकारतात. सर्व करांसह रक्कम ठरलेली असताना, जास्तीचे १० ते १५ रुपये प्रत्येक सिलिंडरमागे जबरीने वसूल केले जातात. घरगुती सिलिंडर पोहोचविण्यासाठी गॅस वितरक सदर डिलिव्हरी बॉयला सिलिंडर पोहोचविण्याचा मोबदला देतात. मात्र, तरीही काही वितरकांकडे काम करणारे डिलिव्हरी बॉय ग्राहकांना सिलिंडर किंमत व्यतिरिक्त घरपोचसेवेचे शुल्क आकारले जात आहे. काही ग्राहकांनी पैसे देण्यास नकार दिल्यास, त्यांच्या दारापुढे अथवा इमारतीखाली गॅस सिलिंडर ठेवून निघून जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. गॅस वितरक फक्त सिलिंडरची रक्कमच अदा करावी, असे सांगत असले, तरी डिलिंव्हरी बॉयकडून जादा पैसे घेतल्याची तक्रार ग्राहकाने केल्यास त्याची दखल मात्र घेतली जात नसल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गॅस वितरकांनी लक्ष घालून ग्राहकांची आर्थिक लुटमार थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Widespread robbery of customers in gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.