शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाघाने कमळीचा मुका का घेतला?, छगन भुजबळांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:35 IST

‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत,

नाशिक: ‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत, असा सवाल राष्टÑवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला.नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, देशाने आजवर अनेक लढाया लढल्या, त्याचा राजकीय अभिनिवेश कुणी दाखविला नाही, परंतु सैनिकांच्या मृत्यूचे व त्यांनी गाजविलेल्या शौर्याचे भांडवल भाजपा करीत आहे. पुलवामा घटनेच्या दिवशी मोदी व शहा राजकीय भाषणबाजीत गर्क असताना, राहुल गांधी यांनी संकटाच्या काळात आपला पक्ष सरकारसोबत असल्याची घोषणा केली, तर प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द करून आपल्या राजकीय परिक्वतेचे दर्शन घडविले.विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका म्हणजे पाकची शरणागती व मोदींची मुत्सद्देगिरीचा डंका भाजपावाले पिटत आहेत. इमरान खान घाबरला, असे सांगितले जात आहे. जर इमरान खरोखरच तुम्हाला घाबरला असेल, तर गेल्या दोन वर्षांपासून पाकच्या कैदेत असलेला कुलभूषण जाधव का सुटत नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७१ मध्ये जिनिव्हा करारानुसार ९९ हजार पाकिस्तानी कैद्यांना पुन्हा पाकच्या हवाली केले होते याची आठवण भुजबळांनी करून दिली व या करारानुसारच अभिनंदनची सुटका झाल्याचे सांगून भाजपा फुकटचे श्रेय घेत असल्याची टीका केली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाShiv Senaशिवसेना