शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना का दिले नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:35 IST

महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केवळ २३ किलो लिटर्सच्या टाकीअभावी पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, त्यातही महापौरांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हेंटिलेटरसाठी टाकी उपलब्ध होत नव्हती तर ते वापराविना पडून ठेवण्याऐवजी खासगी रुग्णालयांना का उपलब्ध करून दिले नाही, किमान काही रुग्णांचे प्राण वाचले नसते का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहापौरांचा प्रश्न । किमान जीव तर वाचले असते

नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केवळ २३ किलो लिटर्सच्या टाकीअभावी पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, त्यातही महापौरांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हेंटिलेटरसाठी टाकी उपलब्ध होत नव्हती तर ते वापराविना पडून ठेवण्याऐवजी खासगी रुग्णालयांना का उपलब्ध करून दिले नाही, किमान काही रुग्णांचे प्राण वाचले नसते का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, फार कमी रुग्णांना आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लागत असले तरी शहरात आॅक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच बिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याच्या कारणावरून येथे दाखल रुग्णांना अन्यत्र पाठविले जाते. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात जर व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही तर खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते, तेथेही असे बेड उपलब्ध होणे कठीण असते. अशावेळी मनपाच्या रूग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स केवळ आॅक्सिजनची टाकी उपलब्ध होत नसल्याने पडून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात महापौरांनी नाराजी व्यक्त केली. कोरोना टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होर्डिंग्ज आणि घंटागाडीव्दारे देण्याचे आदेशही महापौरांनी दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त आष्टीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. राजेंद्र त्र्यंबके व डॉ. प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.शुक्रवारी (दि.४) महापौरांनी वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेतली. महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्या आणि उपचारासाठी रुणालये तसेच त्यातील उपचार सुविधांचा आढावा घेतला. शहरातील रुग्णालयात उपलब्ध आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेडची अद्ययावत माहिती घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी तसेच रोजची ताजी माहिती नागरिकांसाठी खुली करावी, असे निर्देशच महापौर कुलकर्णी यांनी दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या