शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस्अ‍ॅप’चे आदेश बंधनकारक नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 14:45 IST

नाशिक : वरिष्ठ अधिका-यांकडून खालचे कर्मचा-यांना व्हॉटस् अ‍ॅप वा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करून आदेश दिले जाण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये हा प्रकार सर्रास घडू लागला आहे, बहुतांशी वेळेत तांत्रिक कारणास्तव अशा आदेशाचे पालन करण्यात कर्मचा-यांकडून कुचराई होत असल्याचा निष्कर्ष काढून त्यांना वरिष्ठांकडून ...

ठळक मुद्देसरकारचे पत्रक : अधिकारी, कर्मचा-यांना दिलासासोशल माध्यम नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ कर्मचा-यांवर येऊन ठेपली

नाशिक : वरिष्ठ अधिका-यांकडून खालचे कर्मचा-यांना व्हॉटस् अ‍ॅप वा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करून आदेश दिले जाण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये हा प्रकार सर्रास घडू लागला आहे, बहुतांशी वेळेत तांत्रिक कारणास्तव अशा आदेशाचे पालन करण्यात कर्मचा-यांकडून कुचराई होत असल्याचा निष्कर्ष काढून त्यांना वरिष्ठांकडून दंडीत करण्यात येत असल्याने सोशल माध्यम नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ कर्मचा-यांवर येऊन ठेपली आहे, परंतु आता राज्य सरकारनेच याबाबत अधिकृत पत्रक काढून सोशल माध्यमातून दिले जाणारे कोणतेही आदेश पाळणे कर्मचा-यांना बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे.सोशल माध्यमाचा दिवसागणिक वापर वाढू लागला असून, शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय कामकाजात सर्वात सोयीस्कर व सोपी पद्धत म्हणून सोशल माध्यमाचा उपयोग केला जात आहे. त्यासाठी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांचा स्वतंत्र गृप करून त्या गृपच्या माध्यमातून संदेशाची देवाण-घेवाण करण्याबरोबरच वरिष्ठ अधिका-यांकडून कामाच्या सुचना, आदेश देण्यासाठी ‘व्हॉटस् अ‍ॅप’चा अधिक वापर केला जात आहे. विशेष करून आरोग्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर, महसूल, जिल्हा परिषद आदी खात्यांमध्ये सोशल माध्यमातूनच कामकाज केले जात असल्याने वरिष्ठांकडून शासकीय कामकाजाच्या वेळेव्यतिरीक्त देखील कधीही संदेश देऊन माहिती मागविण्याचे किंवा संपर्क करण्याचा प्रकार होऊ लागला आहे. या त्रासाला कर्मचारी वैतागले असून, बहुतांशी वेळेस कर्मचा-यांना सोशल माध्यम हाताळणे काही कारणांमुळे शक्य होत नाही. किंवा तांत्रिकदोष, नेटवर्क आदी बाबींमुळेही वरिष्ठांना प्रत्युत्तर देण्यास उशीर झाल्यास त्याची शिक्षा म्हणून कर्मचाºयांना अधिका-यांच्या रोषास सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सोशल माध्यमातूनच शासकीय कामकाज करण्याकडे अधिकाºयांचा कल वाढत चालल्याने त्यातून अनेक गडबडी होत असल्याने कर्मचा-यांना दंडीत करण्याचे प्रकार घडले आहेत.शासकीय कामात वाढलेल्या सोशल माध्यमाच्या हस्तक्षेपाबद्दल एका व्यक्तीने थेट शासनाच्या सामान्य प्रशाासन विभागाकडे माहिती अधिकारात अर्ज दाखल करून अधिका-यांनी कर्मचा-यांनी व्हॉटस् अ‍ॅप किंवा सोशल माध्यमाद्वारे दिलेले कार्यालयीन आदेश कर्मचा-यांना पाळणे बंधनकारक असल्याचे धोरण किंवा निर्णयाची प्रत मिळावी अशी मागणी केली असता त्यावर शासनाने पत्रक काढून शासन आदेश वा निर्णय व्हॉटस् अ‍ॅप किंवा सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्याबाबत तसेच अशा प्रकारचे सोशल मिडीयावरचे कार्यालयीन आदेश कर्मचा-यांना पाळणे बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाNashikनाशिक