शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:07 IST

नाना पटोले यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

नाशिक : ‘ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते’, असे आणखी एक वादग्रस्त विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी इगतपुरी येथे रविवारी केले. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जाेरदार टीका केली.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी, गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाकीची स्थिती निर्माण झाली असून, लोक भाजपवर हसू लागले आहेत. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिलं, असे सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’, असे म्हटले आहे. 

बावनकुळेंना ओळखत नाही केंद्रातील सरकारने  किती मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले, ती आकडेवारी त्यांनी जाहीर करावी.  आधी केंद्रातील सरकार किती भ्रष्टाचारी आहे ते बघा, नंतर दुसऱ्याच्या घरावर गोटे मारताना आपले घर किती काचेचे आहे ते पाहावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला. आपण बावनकुळेंना ओळखत नसल्याचेही ते म्हणाले.

पटोलेंचा पुतळा जाळून निषेध

कोराडी (नागपूर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे, असे सांगत भाजपतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात रात्री येथे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पटोले यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध केला.पटोले यांनी पंतप्रधानांच्या पत्नीचा संदर्भ देऊन केलेल्या विधानामुळे देशातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे.  महिला हा अपमान कदापि सहन करणार नाही. नाना पटोले यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. 

देशात एकच मोदी नाहीत - नाना पटोले माझी बायको पळाली म्हणून माझे नाव मोदी, असे त्या गावगुंडानेच सांगितले. त्याच विधानाला घेऊन भाजप बसली आहे. पण, देशात काय एकच मोदी नाहीत. निरव मोदी, ललित मोदीही आहेत. भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करत आहेत. जितके पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा तुम्हाला जनताच पेटवेल, असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा