सिग्नलवरील ही निरागस बालके कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:15+5:302021-09-04T04:19:15+5:30

नाशिकमधील वास्तव : संवेदनशील नाशिककरांना हा प्रश्न नक्कीच पडत असणार नाशिक : भीक मागण्यासाठी दीड लाख रुपयांना दोन बालके ...

Whose are these innocent children on the signal? | सिग्नलवरील ही निरागस बालके कुणाची?

सिग्नलवरील ही निरागस बालके कुणाची?

नाशिकमधील वास्तव : संवेदनशील नाशिककरांना हा प्रश्न नक्कीच पडत असणार

नाशिक : भीक मागण्यासाठी दीड लाख रुपयांना दोन बालके विकत घेतल्याचा धक्कादायक आणि तितकाच गंभीर प्रकार औरंगाबाद येथे उघडीस आला. हे वृत्त ज्यांना ज्यांना कळले त्यांना नाशिकमधील सिग्नलवर भीक मागणाऱ्या बालकांची आठवण नक्कीच झाली असणार. ही बालके कुणीची असावीत? असा प्रश्न संयवेदनशील नाशिकरांना दिवसभर भेडसावत असेल.

बालहक्काबाबत कितीही मोहिमा राबविल्या आणि हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायदे असले तरीही बालकांचे शोषण अनेकविध मार्गांनी होतच असल्याचे आपणच अनेकदा पाहतो. आपल्या आजूबाजूला बालपण विस्कटलेली मुले रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत असले तरीही आपण काहीच करू शकत नाही याची खंत अनेकांना वाटली असणार. अतिशय गंभीर सामाजिक प्रश्न बनलेल्या या निरागस शहरातील सिग्नलवर अंधारलेले बालपण आजही दिसते.

१) दत्तमंदिर सिग्नल : नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड परिसरातील दत्तमंदिर सिग्नलवर भीक मागणारे कोमजलेले बालपण रोजच दिसते.

२) आयनॉक्स सिग्नल : याच मार्गावरील आयनॉक्स सिग्नलवर फाटक्या, कळकट कपड्यातील चिमुरडे रोजच भीक मागत असतात. अल्पवयीन मुलींच्या कडेवरील काही महिन्यांचे बाळ आणि रडणारे मूल घेऊन भीक मागणाऱ्या स्त्रिया हे रोजचचे चित्र.

३) द्वारका चौक : वाहनांच्या गर्दीत एक आठ ते दहा वर्षीच मुलगी हातात काठी घेऊन लंगडत लंगडत भीक मागताना दिसते. तिच्या पायाला संपूर्ण बँडेड करण्यात आल्याने तिच्या पायाची गंभीर दुखापतही लक्षात येते. सर्वांचे लक्ष तिच्याकडे जाते मात्र मदतीला कुणीही नसते.

४) गडकरी चौक सिग्नल : गडकरी चौक सिग्नलवर अगदी तीन ते चार वर्षांच्या मुले रस्त्याच्या कडेला उघडी नागडी उभी दिसतात. त्याहून थोडी मोठी मुले भीक मागत मागत या मुलांना सांभाळताना दृष्टीस पडतात.

५) त्र्यंबकनाका सिग्नल : या चौकात चार ते पाच लहान मुले सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांकडे भीक मागत असल्याचे दिसत. सर्वांत गंभीर म्हणजे या मुलांवर लक्ष ठेवणाऱ्या काही महिलांच्या हातात झाडाची फांदी असते ती त्या मुलांच्या पाठीवर पडत असते. त्यांच्या रडण्याचा आवाज मात्र कुणाच्याही कानावर पडत नाही.

Web Title: Whose are these innocent children on the signal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.