शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घाऊक किराणा दुकानदारांचा उद्याचा बंद मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 21:47 IST

जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार

ठळक मुद्देउपकाराचा प्रश्न; चर्चेअंती निघाला तोडगाजिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे तक्रार

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या उपकारावर दहापट दंड वसूल करण्यात येत असल्यामुळे शहरातील घाऊक किराणा दुकानदारांनी येत्या सोमवारपासून (दि १८) पुकारलेल्या दुकान बंदचा इशारा अखेर मागे घेण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तूंवर चुकीच्या पद्धतीने उपकर आकारणी केली जात आहे. राज्यातील बाजार समित्यांकडून आकारण्यात येणाऱ्या या उपकराबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू असतानाच नाशिकमध्ये यासंदर्भात व्यापारी अडचणीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घाऊक धान्यावर एक्का बाजार उपकर वसुली केला जातो. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे अशा स्थितीतही जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार आहे.

यासंदर्भात यापूर्वी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बाजार समितीने दहा ऐवजी पाचपट दंडाची आकारणी सुरू केली. त्यामुळे सोमवारपासून नाशिकमधील किराणा दुकाने बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मात्र रविवारी(दि १७) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकेत, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली त्यानुसार व्यापाऱ्यांची अडवणूक केली जाणार नाही त्यांनी नियमितपणे उपकर भरावा असे मान्य करण्यात आल्याने सोमवारपासून करण्यात आलेल्या किराणा दुकान बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले, असे संघटनेचे नेते प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStrikeसंप