शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

देव तारी त्याला कोण मारी : प्लॅस्टिकच्या गोणीत गुंडाळून अवघ्या साडेतीन तासांच्या चिमुकलीला फेकले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:30 IST

डॉक्टरांनी बाळाची तपासणी करत प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून बाळाला आवश्यक ते डोसदेखील पाजण्यात आले.

ठळक मुद्देहवीशी वाटणारीच झाली 'नकोशी'दत्तक घेण्याची दाम्पत्याची इच्छा'वैरिणी' मातेविरुध्द गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : या जगात येऊन अवघे साडेतीन तास होत नाही तोच एका चिमुकल्या गोंडस अशा नवजात शिशुला प्लॅस्टिकच्या गोणीत गुंडाळून अज्ञात जन्मदात्यांनी बेवारसपणे शिवाजीनगर येथील फाशीच्या डोंगराच्या पायथ्याला फेकून देत पोबारा केला; मात्र 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीनुसार या 'नकोशी'ला जीवदान लाभले आणि जागरुक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या शिशुला श्रमिकनगर रुग्रालयात उपचारार्थ दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी, रविंद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पाळीव श्वानासोबत फेरफटका मारत होते. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज अचानकपणे त्यांच्या कानी पडला आणि पवार यांची पावले जागीच थबकली. जंगलाच्या निर्जन परिसरात नेमके बाळ रडतेय कोठे? म्हणून त्यांनी आजुबाजुला नजर टाकून धुंदाळण्याचा प्रयत्न केला असता एका प्लॅस्टिकच्या गोणीत कापडामध्ये गुंडाळलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी त्वरित बाळाला गोणीतून बाहेर काढत प्राणवायु सहज मिळेल अशी तजवीज केली आणि मदतीसाठी जवळच्या एका मित्राशी संपर्क साधला. या नवजात शिशुला उपचारासाठी त्वरित या दोघांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाची तपासणी करत प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून बाळाला आवश्यक ते डोसदेखील पाजण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. मोरे यांनी या चिमुकलीचे नाव शंकुतला असे ठेवले आहे. या चिमुकलीला जन्म देणाऱ्या 'वैरिणी' मातेविरुध्द गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिसforestजंगलhospitalहॉस्पिटल