सटाणा नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

By Admin | Updated: July 11, 2014 00:21 IST2014-07-10T23:49:19+5:302014-07-11T00:21:55+5:30

सटाणा नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

Who is the head of the city of Satana? | सटाणा नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

सटाणा नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

सटाणा : येथील नगराध्यक्षपदासाठी १९ जुलै रोजी निवडणूक होत असून, निवडीचे वारे वाहू लागले आहेत. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदावर कोण विराजमान होतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
सटाणा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. या पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. यामुळे नूतन नगराध्यक्ष निवड बिनविरोध होणार असली तरीही नगरसेवकांच्या बैठका व सहलींचे नियोजन सुरू झालेले आहे. तब्बल अडीच वर्षे कार्यकाल असलेल्या अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोन नगरसेवक आहेत. नगरसेवक सुलोचना चव्हाण व अनिल कुवर यांची नावे या स्पर्धेत आहेत. सुलोचना चव्हाण या माजी आमदार संजय चव्हाण यांच्या मातोश्री आहेत. यामुळे त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सटाणा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस १३, भाजपा ३, शिवसेना १, रिपाइं १, काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र शहर विकासाच्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी गत अडीच वर्षांच्या कार्यकालात पक्षीय अभिनिवेश बाजूला सारत कामकाज केलेले आहे. यामुळे सर्वसमावेशक असे कामकाज या ठिकाणी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदी सुलोचना चव्हाण यांना विराजमान करून राज्य शासनाकडून अधिकाधिक विकासकामांचा लाभ पदरात पाडून घेणे सोयीचे ठरावे याकरिता रणनीती आखली जाणार आहे. काका रौंदळ व बाळासाहेब सोनवणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित करण्यात येऊन मते जाणून घेतली.
जाणार असल्याचे सांगितले गत अडीच वर्षांचा कार्यकाल महिलाराज म्हणून गेलेला असताना नूतन नगराध्यक्षपदी सुलोचना चव्हाण यांची निवड झाल्यास पाचही वर्षे महिला राज पालिकेत असणार आहे़
गत कार्यकाळात सुमनबाई दगाजी सोनवणे, कौशल्याताई पांडुरंग सोनवणे व सुशीलाबाई दादाजी रौंदळ यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपली टर्म पूर्ण केलेली आहे़

Web Title: Who is the head of the city of Satana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.