टमाट्यावर पांढऱ्या माशीचे आक्रमण
By Admin | Updated: October 4, 2015 23:38 IST2015-10-04T23:36:55+5:302015-10-04T23:38:24+5:30
टमाट्यावर पांढऱ्या माशीचे आक्रमण

टमाट्यावर पांढऱ्या माशीचे आक्रमण
जायखेडा : टमाटा हे पीक कमी वेळात चांगले उत्पन्न देणारे असल्याने मोसम खोऱ्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाट्याची लागवड केली आहे. सध्या टमाट्याला भावही चांगला आहे. मात्र या पिकावर विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यातच
पांढऱ्या माशीचे आक्रमण वाढल्याने तिच्या डंकामुळे निम्म्यापेक्षा जास्त टमाटे सडून खराब होत आहेत. यामुळे टमाटे असे उकिरड्यावर फेकून द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.