शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पोषण कुणाचे?

By किरण अग्रवाल | Updated: March 18, 2018 01:44 IST

शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे.

ठळक मुद्देयंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावरदुर्लक्ष करणा-या घटकांची जबाबदारीही निश्चित करण्याची गरज आहे.

शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण तब्बल अडीच हजार इतके असल्याचे व त्यात तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या सहाशेपेक्षा अधिक असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत पुढे आली असून, शासनाच्या यासंदर्भातील विविध योजना व जिल्हा परिषदेचे प्रयत्न कसे कुचकामी ठरले आहेत, तेच त्यातून स्पष्ट होऊन गेले आहे. कुपोषण टाळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना आखल्या आहेत, पण त्याची सक्षमतेने अंमलबजावणी होत नाही. कागदपत्रे रंगविण्याखेरीज वास्तविकतेकडे लक्षच दिले जात नसल्याने अशी परिस्थिती ओढवते तेव्हा यानिमित्ताने कुपोषण टाळण्यासाठी नेमके काय केले गेले, किती खर्च झाला याचे आॅडिट होणे गैर ठरू नये. कारण निधी खर्ची पडूनही परिस्थिती सुधारली नसेल किंवा कुपोषण टळले नसेल तर त्यातून भलत्याचेच तर पोषण झाले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होणारा आहे. कुपोषण रोखण्यासाठी जो पूरक पोषण आहार दिला जातो, तो गेल्या दोनेक वर्षांपासून दिला गेलेला नसल्याचेही वृत्त आहे. ते खरे असेल तर या दप्तर दिरंगाईला कोण जबाबदारयाचाही सोक्षमोक्ष होणे गरजेचे आहे. अन्यथा म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, पण काळ सोकावण्याचा धोका असतो; तसे व्हायचे. बालकांच्या कुपोषणाबरोबरच मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबतची स्थितीही यापेक्षा फार काही वेगळी नाही. आदिवासी भागातील बालकांचे प्रसूतीदरम्यानच होणारे निधन हा तसा चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे, आदिवासी भागातल्या यासंदर्भातल्या अडचणी एकवेळ समजूनही घेतल्या तरी बिगर आदिवासी प्रकल्पांमध्ये अती गंभीर कुपोषित बालकांची संख्या पावणे तिनशेच्या आसपास निघावी, हे अधिकच गंभीर आहे. आरोग्य, बालकल्याण विभाग किती बेफिकिरीने कामकाज करतो आहे, हेच दाखविणारी ही आकडेवारी आहे. तेव्हा ग्राम बालविकास केंद्र उघडून यावर उपाय योजतांनाच आजवर याकडे दुर्लक्ष करणाºया घटकांची जबाबदारीही निश्चित करण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद