शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भुजबळांच्या नाशकात राष्टÑवादी उरली कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:18 IST

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देदोलायमान स्थिती : तीनही मतदारसंघात आयारामांना दिली संधी

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात केवळ एकदाच प्रतिनिधित्व केलेल्या भुजबळ काका-पुतण्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर विधानसभा निवडणुकीत गेल्या दोन दशकात राष्टÑवादी नाशिक ग्रामीणमधून थोडेबहुत यश मिळवित असताना शहरात मात्र आपली मांड घट्ट बसवू शकलेली नाही. आताही विधानसभा निवडणुकीत शहरातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये आयारामांना पावन करून घेण्याची वेळ राष्टÑवादीवर ओढवली आहे.१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्टÑवादीचे चार आमदार निवडून आले होते. नाशिक शहरात भाजपचे डॉ. दौलतराव अहेर विरुद्ध राष्टÑवादीचे डॉ. वसंत पवार असा सामना झाला; परंतु त्यात भाजपने बाजी मारली होती. २००४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या आमदारांची संख्या एकाने वाढली. निफाडमधून दिलीप बनकर, येवल्यातून छगन भुजबळ, चांदवडमधून उत्तम भालेराव, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तर कळवणमधून ए. टी. पवार विजयी झाले होते. नाशिक शहरातील मतदारसंघातून कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये मात्र राष्टÑवादीला झटका बसत तीनच आमदार निवडून आले. त्यात नांदगाव, कळवण आणि येवल्याचा जागेचा समावेश होता. आघाडीमुळे नाशिक शहरातील नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य कॉँग्रेसला तर नाशिक पश्चिम आणि देवळाली हे मतदारसंघ राष्टÑवादीला सोडण्यात आले होते; परंतु राष्टÑवादीचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. २०१४ मध्ये आघाडी दुभंगल्यामुळे राष्टÑवादीने स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यात राष्टÑवादीने नांदगाव, येवला, बागलाण आणि दिंडोरी या जागांवर विजय मिळविला. नाशिक शहरातील चारही जागांवर उमेदवार दिले; परंतु त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर टिकाव लागू शकला नाही.गेल्या पाच वर्षांत छगन भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्या तुरुंगवारीमुळे राष्टÑवादीची मोठी वाताहत झाली. मागील लोकसभा निवडणुकीत स्वत: छगन भुजबळ यांना तर चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून राष्टÑवादीकडून सेना-भाजपला कडवी लढत दिली जाण्याचे संकेत मिळत होते; परंतु इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराची चर्चाही कानावर पडत नव्हती. सेना-भाजपचे उमेदवार निश्चित होत असताना राष्टÑवादी चाचपडतानाच दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मध्य राष्टÑवादीने कॉँग्रेसला सोडला तर अन्य तीन मतदारसंघात आयारामांना संधी दिली आहे. त्यात नाशिक पूर्वमध्ये भाजपने तिकीट कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांना तर देवळालीमधून भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली.नाशिक पश्चिममध्ये वर्ष-दीड वर्षापूर्वीच भाजपतून राष्टÑवादीत आलेल्या अपूर्व हिरे यांच्या अर्जाला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडण्याची नामुष्की ओढवली. त्यापूर्वी, खुद्द भुजबळ यांनीच नाशिक पश्चिम मतदारसंघ माकपाला सोडण्याचे जाहीर केले होते; परंतु त्यांनाही ऐनवेळी यू टर्न घ्यावा लागला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019