गावठाण क्लस्टर गेले कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:27+5:302021-07-07T04:17:27+5:30
नाशिक : गावठाण भागातील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय महासभेने २००१ मध्ये घेतला, मात्र त्यानंतर हे क्लस्टर झालेच ...

गावठाण क्लस्टर गेले कोठे?
नाशिक : गावठाण भागातील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय महासभेने २००१ मध्ये घेतला, मात्र त्यानंतर हे क्लस्टर झालेच नाही. आताही शासनाने मागवलेला आघात मूल्यमापन अहवाल महासभेत सादर न होताच शासनाकडे पाठवण्यात आला. मात्र, गेल्या दाेन वर्षांपासून क्लस्टरची मंजुरी रखडलेली आहे. त्यामुळे गावठाणातील एकेक वाडे कोसळत असताना गावठाण क्लस्टर गेले कोठे, असा प्रश्न केला जात आहे. नाशिक शहरातील गावठाण विकासाची संकल्पना २०१७ मध्ये महापालिकेच्या विकास आराखड्याला मंजुरी देताना तत्कालीन फडणवीस सरकारने गावठाण क्लस्टर योजना स्वतंत्र जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या क्लस्टरसाठी महापालिकेकडून आघात मूल्यमापन अहवाल मागवण्यात आला होता. गावठाणात वाड्यांच्या पुनर्विकासासाठी चार एफएसआय दिल्यास त्याचे काय परिणाम होतील हे या आघात मूल्यमापन अहवालातून स्पष्ट होणार होते. मात्र, दोन वर्षांपासून हा अहवाल रखडला होता. आधी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनील ड्रोनसाठी पेालिसांकडून परवानगी मिळाली नाही ती डीजीसीएकडून घ्यावी लागली. मात्र, सर्वेक्षण झाल्यानंतरदेखील हा अहवाल गुलदस्त्यात आहे. कोरोनामुळे हा विषय मागे पडल्याचे सांगितले जात असले तरी नाशिककरांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.
मध्यंतरी म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षांत जुन्या नाशकातील तांबट लेन तसेच शिवाजी चौकात काळे आणि कुंभकर्ण यांचे वाडे कोसळले होते. त्या वेळीही या विषयाची चर्चा झाली. मात्र, गावठाण क्लस्टरच्या हालचाली नाहीत. त्यामुळे या क्लस्टरचे काय झाले, असा प्रश्न केला जात आहे. इन्फो.. नाशिकमध्ये एकेक वाडा पडत असताना गावठाण क्लस्टर कुठे गेेेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी केला आहे. यांसदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नाशिक शहरातील घनकर लेन येथे वैश्य वाड्याचा काही भाग कोसळल्याने दुर्घटना घडली. दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्या तरी केवळ जागेवर पाहणी करून आणि नोटिसांचे सोपस्कार पार पडून काय हाेणार, असा प्रश्न शेलार यांनी केला आहे.