शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

केळझरच्या चारीचे घोडे अडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST

निवडणूक कोणतीही असो, वीरगाव परिसरातील जनतेला दरवेळी हमखास एक आमिष दाखविले जाते, ते म्हणजे केळझर चारी क्रमांक ८ च्या काम पूर्णत्वाचे. विशेष म्हणजे, अनेक पंचवार्षिक निवडणुका उलटूनही हे काम १५ वर्षांपासून अपूर्णच आहे. कामासाठी प्रत्यक्ष ना निधी उपलब्ध होतो, ना कामाला गती मिळते. वेळोवेळी निधी उपलब्ध झाल्याचे सांगून याप्रश्नी फक्त आपला स्वार्थ साधून घेण्याचेच काम लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून या कामाचे घोडे अडले कोठे, असा सवाल विचारला जात आहे.

वीरगाव : निवडणूक कोणतीही असो, वीरगाव परिसरातील जनतेला दरवेळी हमखास एक आमिष दाखविले जाते, ते म्हणजे केळझर चारी क्रमांक ८ च्या काम पूर्णत्वाचे. विशेष म्हणजे, अनेक पंचवार्षिक निवडणुका उलटूनही हे काम १५ वर्षांपासून अपूर्णच आहे. कामासाठी प्रत्यक्ष ना निधी उपलब्ध होतो, ना कामाला गती मिळते. वेळोवेळी निधी उपलब्ध झाल्याचे सांगून याप्रश्नी फक्त आपला स्वार्थ साधून घेण्याचेच काम लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून या कामाचे घोडे अडले कोठे, असा सवाल विचारला जात आहे.  केळझर धरणाच्या निर्मितीनंतर या धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणात शेती व पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, हे आरक्षित पाणी शेती क्षेत्रात पोहोचविण्यासाठी डाव्या व उजव्या कालव्यांची निर्मिती करण्यात आली. याच अनुषंगाने केळझर ते डोंगरेज या गावादरम्यान डाव्या कालव्याची निर्मिती करण्यात आली असून, याचा फायदा पश्चिम भागातील आठ ते दहा गावांतील शेतीला होतो आहे. या कालव्याच्या पूर्णत्वानंतर यापुढील वीरगाव, वनोली, भंडारपाडे, तरसाळी, औंदाणे, कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे या गावांनाही सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी डोंगरेज गावापासून पुढील भागात नूतन कालव्याची निर्मिती केली जावी अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून पुढे आली होती. तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी या मागणीची दखल घेत सन १९९९ साली युती शासनाच्या कालावधीत डोंगरेज ते मुळाणे या १०.४४ किमीच्या वाढीव केळझर चारी क्र. ८ च्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून आणली होती. या चारीच्या मातीकामासाठी त्यावेळी तत्काळ आर्थिक तरतूद होऊन या कालव्याचे सर्वेक्षण, भूसंपादन मोबदला व सुमारे ६५ टक्के मातीकाम पूर्ण करण्यात आले. सन २०१३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन संबंधित विभागाकडून करण्यात आले होते; मात्र शेतकरी वर्गाकडून खोदकामात अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या अडचणी व शासन पातळीवरून निधीची कमतरता यामुळे हे काम आजही वर्षानुवर्षे रेंगाळतानाच दिसून येत आहे. केळझर धरण पावसाळ्यात भरल्यानंतर डाव्या कालव्याअंतर्गत दरवर्षी डोंगरेज या गावापर्यंत पूरपाणी तसेच शेतीसाठी आवर्तीत पाणी उपलब्ध होत असते. पूरपाण्याने या भागातील छोटे-मोठे बंधारे भरून घेतले जात असल्याने डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला याचा मोठा लाभ होतो आहे. मात्र डोंगरेज गावापासून पुढे असलेल्या चारी क्र. ८ च्या अपूर्णावस्थेतील कामामुळे अगदी बांधापर्यंत पूरपाणी पोहोचूनही पुढील गावातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने या भागातील शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.  गेल्या १५ वर्षांपासून येथील शेतकरी चारीच्या कामाच्या पूर्णत्वाची आस लावून बसला आहे. लोकसभा, विधानसभा वा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या की प्रत्येकवेळी हा प्रश्न उचलून धरला जातो. ‘मला निवडून द्या, आमच्या पक्षाला निवडून द्या, तत्काळ चारी क्र मांक ८ च्या कामाला सुरुवात करू’ अशी आश्वासने दिली जातात; मात्र निवडणुका झाल्या की पुढील निवडणुकीपर्यंत एकही लोकप्रतिनिधी या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही. या प्रश्नावर फक्त राजकारण होत असल्याचा आरोप लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गाने केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गत काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचन कामांबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात बागलाण तालुक्यातील अपूर्ण असलेल्या सिंचन योजनांच्या कामांबाबत खासदार भामरे यांनी ऊर्ध्व गोदावरी खोºयाच्या अधिकारी वर्गाची झाडाझडती घेत कामकाजाबाबत जोरदार ताशेरे ओढले होते. यानंतर या कामासह तालुक्यातील अन्य सिंचन योजनांसाठी कोट्यवधी रु पयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. कामात अडचणी येणाºया ठिकाणी समझोत्यातून, प्रसंगी बळाचा वापर करून कामे पूर्ण केली जावी, असे आदेश देण्यात आले होते.