शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या काँग्रेसमधील मरगळ कधी झटकली जाणार?

By किरण अग्रवाल | Updated: February 21, 2021 01:20 IST

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाने आपले वर्चस्व दाखवून देत स्वबळाची भाषा चालवली असताना काँग्रेस मात्र गलितगात्र अवस्थेतच दिसते आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी व शिवसेनेची महापालिकेसाठी स्वबळाची तयारीबहुमत नव्हते, तरी व्यक्तिगत प्रभावातून सत्ता..कोणाच्या नेतृत्वात महापालिका लढायची असा प्रश्न काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना पडला तर आश्चर्य वाटू नये.

सारांशनसलेले बळ आजमावण्याच्या फंदात न पडता शांत व स्वस्थच राहणे आणि जे मिळेल त्यात समाधान मानणे लाभाचे असते. नाशिक महापालिकेच्या वर्षभरावर आलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने शड्डू ठोकून आतापासूनच राजकीय हाकारे-पिटारे चालविले असले तरी काँग्रेस मात्र निवांत आहे ते त्यामुळेच. समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ मिलता नही, या भगवद‌्गीतेतील उपदेशावर विश्वास बाळगणारा त्यांच्यासारखा अन्य पक्ष असू नये जणू.नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, मनसेने स्थानिक पातळीवरील संघटनात्मक नेतृत्वात अलीकडेच बदल करून आपली तयारी सुरू करून दिली आहे. नुकतेच शिवसेनेचे नेते संजय राऊत नाशकात येऊन छगन भुजबळ यांना भेटून गेले. त्या भेटीत चर्चा काय झाली हे बाहेर आले नाही; पण महापौर शिवसेनेचाच होईल हे मात्र राऊत स्पष्ट करून गेले. भुजबळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना महाआघाडी होईल तेव्हा होईल; परंतु स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा म्हणून फर्मावले आहे. अर्थात महाआघाडीतील शिवसेना असो की राष्ट्रवादी, हे दोन्ही पक्ष नाशकात आपलेच वर्चस्व गाजवत असतात; सहकारी काँग्रेसला विश्वासात घेण्याची अगर जमेत धरण्याची त्यांना गरज वाटत नाही इतकी काँग्रेस कमकुवत आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष राहिलेले अशोक चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ व संवेदनशील नेते आपल्या नाशिक दौऱ्यात येथील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावून जाणे स्वाभाविक आहे.नाशिकमधील काँग्रेसला लागलेली गटबाजीची कीड हा यासंदर्भातील महत्त्वाचा अडसर आहे. पदांसाठी समांतर काँग्रेसचे प्रयोग करणारे नेते येथे आहेत. कशाला, मागे अशोक चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी महापालिकेत शाहू खैरे यांच्या ऐवजी हेमलता पाटील यांची गटनेतापदी नियुक्ती केली तर ती अद्याप अमलात येऊ शकलेली नाही; म्हणजे पक्षाच्याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून सारे सुखेनैव सुरू आहे. मूठभरांच्या दावणीला पक्ष बांधला गेला आहे. नगरसेवक पद असो की आमदारकीची उमेदवारी, महापालिकेतील स्थायी समिती असो, की गटनेतेपद; तेच ते चेहरे पुढे होतात. दुसऱ्यांना संधीच मिळू दिली जात नाही, त्यामुळे पर्यायी नेतृत्वही विकसित होत नाही.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना बदलून त्यांच्याजागी तुषार शेवाळे यांना नेमले गेले, तेव्हा शहराध्यक्ष बदलाचीही चर्चा झडून गेली होती; पण शरद आहेर आजतागायत कायम आहेत. प्रभारी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला स्थायी स्वरूपात सात सात वर्षे ढकलावी लागत असतील तर त्यातूनच या पक्षाची निर्नायकी अवस्था स्पष्ट व्हावी. आता तर आहेर यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. त्यांची कोणती चमकदार कामगिरी प्रदेश नेत्यांना भुरळ पाडून गेली हा खरे तर संशोधनाचाच विषय असून, दरबारी राजकारणाला आलेले महत्त्व त्यातून स्पष्ट व्हावे. पण त्यानिमित्तानेही शहराध्यक्षपदाची खुर्ची रिकामी होताना दिसत नाही किंवा पक्षाकडून खांदेपालट झालेला नाही. अशास्थितीत कोणाच्या नेतृत्वात महापालिका लढायची असा प्रश्न काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना पडला तर आश्चर्य वाटू नये.बहुमत नव्हते, तरी व्यक्तिगत प्रभावातून सत्ता..नाशिक महापालिकेत प्रारंभीच्या काळात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला; परंतु या पक्षाला बहुमत कधीच लाभले नाही, तरीदेखील व्यक्तिगत प्रभावातून व मातब्बरीतून शांताराम बापू वावरे, पंडितराव खैरे, प्रकाश मते महापौर झाल्याने काँग्रेसची सत्ता राहिली. तद्नंतर जोडतोडच्या गणितातून शोभा बच्छाव यादेखील महापौर झाल्या; परंतु त्यांच्यानंतर काँग्रेस कधीही प्रभावी ठरू शकली नाही कारण तशी मातब्बरी असलेले स्थानिक नेतृत्व या पक्षाला लाभू शकले नाही. अलीकडच्या काळात तर महापौर किंवा उपमहापौर पदावर दावेदारी करण्याइतकेही बळ काँग्रेसला जुळवता आले नाही.

टॅग्स :BJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका