शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोडसे यांच्या प्रचाराला कोकाटे कधी निघणार?

By किरण अग्रवाल | Updated: February 24, 2019 00:59 IST

शिवसेनेने स्वबळाचा नारा सोडून देत भाजपासोबत युती केली असली, तरी स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात शड्डू ठोकून तयार बसलेल्यांत मनोमीलन घडून येणे म्हणावे तितके सहज सोपे नाही. यातही लोकसभा निवडणुकीत एकवेळ जमून जाईलही कारण तेथे इच्छुक कमी आहेत, परंतु विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तेथे काय?

ठळक मुद्दे मध्यंतरी तुटलेली ‘युती’ जुळविण्यात अखेर यश आले पक्षांतील इच्छुकांना ठिकठिकाणच्या उमेदवाऱ्या खुणावत होत्या.दिंडोरीत भाजपासाठी सेना तसे करेल का?

सारांशसर्वांत जुनी राजकीय मैत्री म्हणून मध्यंतरी तुटलेली ‘युती’ जुळविण्यात अखेर यश आले असले तरी, वरिष्ठ नेत्यांचे जितके सहजपणे मनोमीलन झाले तितके वा तसे ते स्थानिक पातळीवर हमरीतुमरीने पेटलेल्या आणि निवडणूक लढण्याच्या अपेक्षित संधीने भारलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांत घडून येणे शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपेयी कधी रणांगणात उतरणार याबद्दल उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक आहे.शेंडी तुटो वा पारंबी ‘युती’ होणार नाहीच, अशा वल्गना यापूर्वी केल्या गेल्याने भाजपाशिवसेना या दोन्ही पक्षांतील इच्छुकांना ठिकठिकाणच्या उमेदवाऱ्या खुणावत होत्या. लोकसभा व विधानसभेच्या दृष्टीने काहीजण तयारीलाही लागले होते, परंतु नाही नाही म्हणत ‘युती’ झाल्याने अशांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. ‘युती’ होणारच असा कयास बांधून व दिंडोरीची जागा विद्यमान खासदारांच्या पक्षालाच जाईल हे ताडून धनराज महाले यांनी अचूकवेळी पक्षांतर करून राष्ट्रवादी गाठली; पण इतरांना तसे जमलेले नाही. त्यामुळे आता ‘युती’ची घोषणा झाल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.नाशिक लोकसभा जागेच्या दृष्टीने भाजपातर्फे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर होते. पण आता केलेली तयारी सोडून ज्यांच्या विरोधात लढायचे होते, त्या शिवसेनेच्या संभाव्य हेमंत गोडसे यांच्याच प्रचाराला बाहेर पडावे लागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ घातली आहे. म्हणजे येथे नाशकात ही अडचण, तर तिकडे सिन्नरमध्ये आमदारकीच्या प्रचारात राजाभाऊ वाजे यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे, हा त्यापेक्षा अवघड प्रश्न कोकाटे यांच्यापुढे आहे. परिणामी स्वभाव व निर्णयात सडेतोडपणा ठेवणारे कोकाटे ही राजकीय घुसमट सहन करू शकतील, याबाबत शंका बाळगली जाणे गैर ठरू नये.महत्त्वाचे म्हणजे, केंद्रात भाजपाचे सरकार हवे म्हणून नाशकात भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेला प्रामाणिकपणे मदत करतीलही; परंतु दिंडोरीत भाजपासाठी सेना तसे करेल का? कारण, मुळात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची संधी गेली ही एक बाब आहेच, शिवाय भाजपाच्या विद्यमान खासदारांनी आपल्याशी फारसे सख्य ठेवल्याची शिवसैनिकांची भावना नसल्याचाही मुद्दा आहे. अशात भाजपाने ज्यापद्धतीने शिवसेनेला झुंजविले व वेळोवेळी कमी लेखले त्याचा सुप्त राग म्हणून शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या उमेदवाराला मदत घडून येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.विधानसभेच्या निवडणुकीतील ‘युती’बाबतच्या संभाव्य परिणामांची चर्चा करायची, तर नाशकातीलच भाजपाच्या तिघा विद्यमान आमदारांना शिवसेनेची प्रामाणिक मदत होण्याची अपेक्षाच धरता येऊ नये. मध्य नाशिक, सिडको-सातपूर मतदारसंघात शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची तयारी स्पष्टपणे दिसून येत होती, ते मनाला मुरड घालून भाजपाचा प्रचार करणे कठीण आहे. नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपाला नेहमी आडवी जाणारी शिवसेना आता त्यांच्यासाठी ‘दक्ष’ होणे अवघड आहे. सिडकोत तर शिवसेनेतच इच्छुकांची संख्या मोठी आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे अशी काही नावे आहेत जी ऐनवेळी आपल्यातील स्पर्धा विसरून भाजपासाठी प्रचार करतील का? तसेच नाशिक मध्यमध्ये अजय बोरस्तेंकडून फरांदे यांच्या प्रचाराची अपेक्षा करता येऊ नये. गेल्यावेळी सर्वच परस्परांविरोधात लढलेले असल्याने त्यांच्यात मनोमीलन घडून येणे म्हणजे निवडुंगावर फूल उमलण्यासारखे ठरेल.मुळात शिवसेना नेत्यांनी ज्या आक्रमक व विखारीपणे भाजपावर तोफा डागल्या आहेत ते पाहता भाजपातील फळीही खूप काही प्रेमाने, झाले गेले विसरून कामाला लागेल, असे नाही. पण त्यांना दिल्ली हवी असल्याने ते अपमान व अवमान गिळतीलही. मात्र शिवसेनेचे काय? युतीची घोषणा झाली असली तरी स्थानिक पातळीवर तसे चित्र दिसून येण्याबाबत शंका घेतली जाणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकParliamentसंसद