लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात

By Admin | Updated: June 15, 2014 01:28 IST2014-06-15T01:27:11+5:302014-06-15T01:28:04+5:30

लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात

When taking a bribe, Devalali's police net | लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात

लाच घेताना देवळालीचा पोलीस जाळ्यात

 

नाशिकरोड : गुन्ह्यामध्ये अटक व पोलीस कोठडी टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देवळाली कॅम्प येथील पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ विलास प्रसाद उजागरे असे पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून, तो देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत होता़
तक्रारदाराच्या कुटुंबीयांवर महिलेच्या शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल आहे़ यामध्ये तक्रारदाराच्या भावाचे नाव असल्याने त्याची अटक टाळून कोर्टात हजर न करणे व पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी टाळण्यासाठी उजागरे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली
होती़
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती दिली होती़ त्यानुसार आज सापळा रचण्यात आला होता़ सदर रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले
आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: When taking a bribe, Devalali's police net