आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 01:34 IST2020-11-07T23:21:00+5:302020-11-08T01:34:40+5:30
आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी ?
आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
नाशिक शहर व जिल्ह्याला जोडणारा तसेच गोंदे दुमाला, अंबड व सातपूर या तीन अत्यंत मोठ्या औद्योगिक वसाहतीनाही जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने शेकडो नागरिकांची सातत्याने वर्दळ असते.
दरम्यान, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, एकपदरी असलेल्या या रस्त्यावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे.
रस्ता ठिकठिकाणी उंच सखल झाला असून, साइडपट्ट्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेक छोटेमोठे अपघात घडले होत असून, स्थानिक युवकांना याचा तीव्र आर्थिक फटका बसला आहे.
सार्व.बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण सुरू न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा सांजेगावचे माजी चेअरमन केरू पा गोवर्धने, सरपंच सविता गोवर्धने, चेअरमन लहानु पा गोवर्धने, आहुर्लीचे सरपंच राजाराम गायकर, चेअरमन रघुनाथ पा. खातळे, माजी चेअरमन नवनाथ गायकर, ग्रामपंचायत सदस्य गोविंद खकाळे, रामदास गायकर, रंगनाथ खातळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खातळे, बाबूराव लक्ष्मण खातळे, साहेबराव खातळे, दत्तू गायकर, नानासाहेब गोवर्धने, माजी सरपंच संजय लक्ष्मण गोवर्धने, देवराम गोवर्धने,. बाळू गेणू गोवर्धने, गोकुळ मते, सचिन मते, दत्तू मते, शंकर मते, भिका पा. मेदडे, नितीन गोवर्धने, अशोक आहेर, शंकर सराई, त्रिंबक सराई, एकनाथ सदगिर, सरपंच गोकुळ सदगिर, वैभव गोऱ्हे, कचरू पा. धात्रक, कचरू बागुल आदींसह असंख्य नागरिकांनी केली आहे.
यात सगळ्यात जास्त पडझड दुचाकीस्वाराची होते. या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार पडलेले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकीची व डोळेझाकपणाची झळ आर्थिकदृष्ट्या गोरगरीब कामगार, मजूर यांना बसत आहे.
यापुढे असे छोटे-मोठे अपघात झाले तर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यावर बिनदिक्कतपणे गुन्हे दाखल करू.
- बाळासाहेब गोवर्धने, त्रस्त नागरिक.