आमदार जेव्हा रुद्रावतार धारण करतात तेव्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:06+5:302021-07-17T04:13:06+5:30

कळवण तालुक्यात रस्ता कामात दिरंगाई खपून घेणार नाही. नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत जनतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सब ठेकेदाराच्या मनमानीने ...

When MLAs wear Rudravatar ...! | आमदार जेव्हा रुद्रावतार धारण करतात तेव्हा...!

आमदार जेव्हा रुद्रावतार धारण करतात तेव्हा...!

कळवण तालुक्यात रस्ता कामात दिरंगाई खपून घेणार नाही. नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत जनतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सब ठेकेदाराच्या मनमानीने दिरंगाईला आमंत्रण दिल्याचे समोर येताच संतप्त झालेल्या आमदार पवारांचा रुद्रावतार पाहून उपस्थितदेखील काही काळ आवाक झाले. कळवण शहरातील मेन रोडचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करा अन्यथा १ जानेवारीला आंदोलन करण्याचा इशाराही पवार यांनी दिला. रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजण्याच्या सूचना करून रस्ता कामाचे नियंत्रण नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून घेत कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. याप्रसंगी आ. नितीन पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता सोनग्रा यांची कळवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, दिगंबर रायते, चंद्रकांत कोठावदे, गंगाधर गुंजाळ, भूषण पगार, उमेश सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. अवघ्या एक किलोमीटरचे काम गेल्या दीड दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून ठेकेदाराच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार कामाला सुरुवात होते, शासकीय यंत्रणेचा कुठलाही अंकुश नसल्याने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कळवणकर जनता वैतागली असल्याची भावना यावेळी सहायक जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडे व्यक्त करण्यात आली.

इन्फो

रामभरोसे काम

नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळवण शहरातील मेन रोड या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याचे दुतर्फा काँक्रिटीकरण काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या रस्त्याचे काम ८-८ दिवस बंद असते, मशिनरी उभी असते त्यामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने कळवणकर जनतेला एकतर्फी वाहतुकीचा वैताग आला आहे. रस्त्यावर एकदा खड्डे केले की, १५ दिवस कुणीही ढुंकून पाहत नाही. त्यामुळे रामभरोसे चाललेल्या या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कधीही कामावर दिसून आली नसल्याने कामाला गती मिळाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

फोटो - १६ नितीन पवार

कळवण येथील मेन रोडच्या कामाबाबत आ. नितीन पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांना निवेदन देताना मोहनलाल संचेती, दिगंबर रायते, चंद्रकांत कोठावदे, गंगाधर गुंजाळ, भूषण पगार, उमेश सोनवणे.

160721\16nsk_25_16072021_13.jpg

फोटो - १६ नितीन पवार  कळवण येथील मेनरोडच्या कामाबाबत आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांना निवेदन देतांनामोहनलाल संचेती,  दिगंबर रायते, चंद्रकांत  कोठावदे, गंगाधर  गुंजाळ, भूषण पगार, उमेश सोनवणे. 

Web Title: When MLAs wear Rudravatar ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.