शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हात बाजारपेठा जलमय होतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:17 IST

शहर व परिसरात ठिकठिकाणी स्मार्टसिटी कंपनीकडून विविध विकासकामे केली जात आहे. अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर कालिदास कलामंदिरापर्यंत खोदकाम ...

शहर व परिसरात ठिकठिकाणी स्मार्टसिटी कंपनीकडून विविध विकासकामे केली जात आहे. अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर कालिदास कलामंदिरापर्यंत खोदकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. दुपारच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या खोदकामात जलवाहिनीला भगदाड पडले अन‌् पाण्याचे कारंजे हवेत उडाले. क्षणार्धात मोठ्या प्रमाणात पाणी कालिदास कलामंदिर ते शिवसेना कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरून वाहू लागले. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की शालिमार, शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली, सरस्वती लेन, दहीपूल हा सर्व बाजारपेठांचा परिसर जलमय झाला होता. यामुळे विक्रेत्यांसह नागरिकांचे चांगलेच हाल झाले. येथील दुकानदारांचा काही मालही पाण्यात भिजल्याची तक्रार संबंधितांनी केली. रविवारची सुट्टी असल्यामुळे मनपा पाणीपुरवठा (यांत्रिकी) विभागासह अन्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासही विलंब झाला. सुमारे अर्धा तास पिण्याचा पाण्याचा मोठा अपव्यय होत राहिल्याने, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अचानकपणे शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या बाजारपेठांच्या भागात पाण्याचा लोंढा नेमका येतोय कोठून, असा प्रश्न मेनरोड, भद्रकाली, शिवाजी रोड या भागातील नागरिकांना पडला होता. मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा या भागात वाहत होता. एकीकडे जुने नाशिकसारख्या गावठाण भागात दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे मात्र ‘स्मार्ट’ कारभाराच्या नावाखाली अशा पद्धतीने जलवाहिन्या फुटतात अ‌न‌् लाखो लीटर पिण्याचे पाणी गटारीत जाते, यास मनपा प्रशासन अन‌् स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय कारणीभूत असल्याचे नाशिककर म्हणाले.

---इन्फो--

सरस्वती नाला गोदाघाटावर ओसंडून वाहिला

जुने नाशिक भागातून गोदावरीला जाऊन मिळणारा भूमिगत सरस्वती नाला या जलवाहिनीच्या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे खळाळला. रामसेतू पुलाखाली या नाल्याचे पाणी गोदापात्रात ओसंडून वाहू लागल्याने येथील भाजीविक्रेत्यांची धावपळ उडाली. कपुर्थळा मैदानावर भरणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना आपला माल उचलून घेत सुरक्षितरीत्या स्थलांतर केले. शहरात पाऊस झाला नाही. मात्र, अचानकपणे सरस्वती नाल्याला पूरसदृश्य स्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न गोदाघाटावरील विक्रेत्यांनाही पडला होता. (फोटो-११७)

---कोट---

स्मार्टसिटीचे काम सुरू असून, या खोदकामात जेसीबीचा धक्का जलवाहिनीला लागल्यामुळे जलवाहिनी अचानकपणे फुटली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. जलवाहिनीतून वाहणारे पाणी थांबविण्याची कार्यवाही सुरू केली. या जलवाहिनीचा मुख्य व्हॉल्व बंद करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले, तरी सोमवारी या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या काही लोकवस्तीमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे.

- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

----

फोटो क्र : २८पीएचएफबी१०० : मेनरोडवरील नवापुरा भागातून वाहणारे पाणी.

१०३/१०५- शालिमारकडून शिवाजी रोडकडे झेपावणारे पाणी.

२८पीएचफबी १०९ : महाकवी कालिदास कलामंदिरासमोरून शालिमारकडे येणारा पाण्याचा लोंढा.

१०८ : जलमय झालेला शालिमार चौक

(छायाचित्रे : नीलेश तांबे)