स्कूल बसेसची चाके रुतलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 09:59 PM2020-08-12T21:59:56+5:302020-08-13T00:08:58+5:30

सायखेडा : शासन आदेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक-मालक अडचणीत आले आहेत.

The wheels of school buses are rotten! | स्कूल बसेसची चाके रुतलेलीच !

स्कूल बसेसची चाके रुतलेलीच !

Next
ठळक मुद्देशाळा बंद : चालक-मालक अडचणीत; कर्जहप्ते थकले, घर चालविणेही अवघड

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : शासन आदेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक-मालक अडचणीत आले आहेत.
उत्पन्नाचे साधन म्हणून मोठे कर्ज घेत स्कूल बस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत नसल्याने वाहनं दारासमोर उभी करून ठेवली आहेत. बससाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत मालकवर्ग आहे, तर दुसरीकडे चालकदेखील वेतन नसल्याने अडचणीत आला आहे. पर्यायी नोकऱ्यादेखील उपलब्ध नसल्याने त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे. यात स्कूल बसचालक-मालकांचाही प्रश्न आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसेस सज्ज असताना शाळाबंदमुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात हजाराच्या वर स्कूल बसेसची संख्या आहे. बहुतेक शाळांकडे स्वत:च्या स्कूल बसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे.
दुसरीकडे अनेकांनी स्वत:ची बस खरेदी करून शाळांना लावल्या आहेत. काही मालक स्वत: तर काहींनी चालक ठेवलेले आहेत. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या स्कूल बसेसची चाके अद्याप रुतलेलीच आहेत. यामुळे स्कूल बसमालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन-प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची विनंती संबंधित व्यावसायिकांनी केली आहे.१ स्कूल बसमालकांप्रमाणेच चालकदेखील अडचणीत आले आहेत. मालकाकडून वेतन बंद झाल्याने तसेच टुरिझम बंद असल्याने इतर कुठेही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. घर चालविणे गरजेचे असल्याने चालकवर्ग पर्यायी नोकरीच्या शोधात पायपीट करत असल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने तसेच शिक्षण कमी असल्याने काही चालकांनी भाजीपाला व्यवसाय तर काहींनी मातीकामदेखील स्वीकारले आहे तर काही जण गावी गेले असल्याची माहिती स्कूलमालक संदीप दराडे यांनी दिली. कोरोनामुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर गंडांतर आल्याने स्कूल बसचालकांसमोर घर चालविण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.२ अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून स्कूल बस व्यवसायाची निवड केली. यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले. आतापर्यंत सर्व ठीक होते. हप्ते वेळेवर भरले; परंतु कोरोनामुळे शाळा उघडण्यास परवानगी नसल्याने स्कूल बसेसदेखील बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न होत नसल्याने हप्ते थकले आहेत. बँकांची कर्जफेड कशी करावी तसेच कुटुंब कसे चालावावे, असे मोठे प्रश्न स्कूल बसमालकांपुढे उभे ठाकले आहेत.मी शेती करतो. जोडधंदा म्हणून स्कूल बसचा पर्याय निवडला होता. बँकेकडून कर्ज घेत व्यवसाय सुरू केला. प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र आता अडचणी सुरू झाल्या आहेत. कर्ज हप्ते थकले. उत्पन्न नसल्याने घर चालविणे अवघड झाले आहे. असल्याने पर्यायी नोकरीसाठी अनेक ठिकाणी विचारपूस केली मात्र नकार मिळाला. यामुळे आता पुढील आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- ज्ञानेश्वर कमानकर,
स्कूल बसचालक-मालक

Web Title: The wheels of school buses are rotten!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.