शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेल्वेची चाके लोहमार्गावरून घसरली, वाहतूक खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:58 IST

दौंड-मनमाड लोहमार्गावर अंकाई किल्ला रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पुढे जीएफ – १ कॅबिनसमोर हा अपघात मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला

ठळक मुद्देया गाडीच्या १६४३२ या बोगीचे दोन चाके रूळावरून घसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने ही माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. अंकाई किल्ला लोहमार्गावर ५०२/२ येथे ही घटना घडली.

मनमाड (नाशिक) : दौंडकडून मनमाडकडे येणारी गाडी क्रं ००१२३ किसान रेल्वे या शेतीमाल वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीचे मनमाड स्थानकाजवळील नगरचौकी कॅबिनजवळ बोगीचे दोन चाके लोहमार्गावरून घसरली. त्यामुळे, तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु, अत्यावश्यक सेवा असलेली किसान रेल्वे तब्बल तीन तास अपघातस्थळी उभी होती. त्यामुळे या गाडीने शेतीमाल पाठविण्यास विलंब झाला.          दौंड-मनमाड लोहमार्गावर अंकाई किल्ला रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पुढे जीएफ – १ कॅबिनसमोर हा अपघात मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला. किसान रेल्वे क्रमांक ००१२३ सांगोला ते शालीमार (उत्तरप्रदेश) अशी ही किसान रेल होती. या किसान रेल्वे गाडीमध्ये कांदासह इतर शेती उत्पादित माल होता. जो महाराष्ट्रातून परप्रांतात रेल्वेने पाठविण्यात येत होता. अंकाई किल्ला रेल्वे स्थानकांतून ही गाडी मनमाडच्या दिशेने निघाली. यावेळी मनमाडकडे येण्यासाठी मनमाड-नगर मेन लोहमार्ग आणि शेजारी कॉडलाईन आहे. मालगाड्या कॉडलाईनवरून रेल्वे स्थानकांत घेतल्या जातात. जीएफ -१ कॅबिनच्या समोरुन ही किसान रेल जात होती. त्यावेळी कॅबिनमन सतिश गांगुर्डे यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखविली. पण काही क्षणात कॅबिनसमोर मोठा आवाज झाल्याने गांगुर्डे यांनी तातडीने चालकाला लाल झेंडा दाखविला. त्यामुळे वेळीच गाडी थांबली. 

या गाडीच्या १६४३२ या बोगीचे दोन चाके रूळावरून घसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने ही माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. अंकाई किल्ला लोहमार्गावर ५०२/२ येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे यातायात पथक आणि अॅक्सिडंट रिलिफ ट्रेन अन्य मार्गावरून घटनास्थळी दाखल झाली. पथकातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घसरलेली दोन्ही चाके रूळावर घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरू केले होते. तब्बल दोन तासानंतर लोहमार्गाखाली घसरलेली चाके पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर ही गाडी संथ गतीने मनमाड रेल्वे स्थानकांत घेण्यात आली. 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेdaund-acदौंड