मानधन मिळाले, पण नियमित वेतनाचे काय?

By Admin | Updated: May 3, 2014 16:18 IST2014-05-03T15:00:01+5:302014-05-03T16:18:50+5:30

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या दिवसांचे मानधन मिळाले खरे; मात्र अजूनही बहुतांश कर्मचार्‍यांना माहे मार्च महिन्याचे वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

What was paid, but what about regular wages? | मानधन मिळाले, पण नियमित वेतनाचे काय?

मानधन मिळाले, पण नियमित वेतनाचे काय?

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा सवाल
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या दिवसांचे मानधन मिळाले खरे; मात्र अजूनही बहुतांश कर्मचार्‍यांना माहे मार्च महिन्याचे वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश म्हणजे ९० टक्क्यांहून अधिक कर्मचारी व अधिकार्‍यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणापासून तर मतदान होईपर्यंतच्या विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते. काहीशा अनिच्छेनेच केलेल्या या कामाचे मानधन मात्र जिल्हा परिषदेच्या बहुतांश कर्मचार्‍यांना रोखीने मिळाले आहे. मात्र गेल्या मार्च महिन्यापासूनचे मासिक वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यातही वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचार्‍यांचे वेतन न झाल्याने त्यांना कर्जाचे हप्ते भरता आलेले नाहीत. त्या कर्जावरील व्याज व दंडाचा भुर्दंड त्यांना सोसावा लागला आहे. आता मे महिना उजाडूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम व शिक्षण विभागासह काही विभागांतील कर्मचार्‍यांना अद्यापही मार्च महिन्याचे मासिक वेतन मिळालेले नाही. एकीकडे निवडणुकीच्या कामाचे मानधन वेळेवर मिळालेले असताना, दुसरीकडे नियमित वेतनासाठी मात्र बहुतांश कर्मचार्‍यांच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे. तातडीने वेतन करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What was paid, but what about regular wages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.