शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

भुजबळ-कांदे वादाचे खरे कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

नाशिक : दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करूनही पुत्र पंकजला नांदगाव मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला, तर ...

नाशिक : दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करूनही पुत्र पंकजला नांदगाव मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला, तर एक वेळा अपयशी पदरी पडल्यानंतर दुसऱ्यांदा महत्प्रयासाने सुहास कांदे यांना मिळालेला विजय या दोन्ही गोष्टी तशा समानच असल्या तरी, अजूनही राजकारणातील धग कमी झालेली नाही हे काल-परवा नांदगावच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. भुजबळ-कांदे वादाची अजूनही चर्चा होत असून, त्यामागे वरकरणी पूरग्रस्तांचा मदतीचा उमाळा हे कारण दिसत असले तरी, प्रत्यक्षात एकमेकांचा राजकीय वर्चस्ववादच त्यास कारणीभूत असावा याचे सबळ कारणेही पुढे येऊ लागली आहेत.

नांदगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन होत्याचे नव्हते झाले. शाकांबरी, लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले, तर व्यावसायिक उघड्यावर पडले. शेतीतील पिके मातीसकट वाहून गेल्याने नजीकच्या काळात किती वर्षे शेती नापिकी राहते हे सांगता येणे अशक्य असल्याची परिस्थिती पाहता, पश्चिम महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल. त्यामुळे शासनकर्ते म्हणून आमदार सुहास कांदे यांच्यावर जशी पूरग्रस्तांना धीर देण्याची जबाबदारी येते, ओघानेच जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ यांच्यावरही ती कायम आहे. परंतु सरकारी यंत्रणेच्या आढावा बैठकीतच कांदे यांनी भुजबळ यांच्याकडे मदत जाहीर करण्याचा आग्रह धरावा व त्यासाठी ‘तू तू, मै मै’पर्यंत मजल जाण्याची बाब पाहता, यात मदतीसाठी आग्रही की, भुजबळांप्रती नांदगावच्या जनतेत दूषित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न? हा प्रश्न निर्माण होतो. कांदे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रायगडच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तेथील पूरग्रस्तांनी ठाकरे यांच्याकडे मदतीचा आग्रह धरला. मात्र ठाकरे यांनी तत्काळ कोणतीही मदत जाहीर न करता, शासकीय यंत्रणेच्या पंचनाम्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला. सुहास कांदे यांना हे ठावूक नसेल असे म्हणता येणार नाही.

चौकट====

काय असू शकतात कारणे

सुहास कांदे यांच्या बाजूने-

* नांदगावकर पुराच्या पाण्याचा सामना करीत असताना कांदे यांनी मदत कार्यात हिरिरीने भाग घेतला.

* शासकीय मदतीवर अवलंबून न राहता, पदरमोड करून अनेकांच्या अन्न-पाण्याची सोय केली.

* शासकीय यंत्रणेकडून जलदगतीने कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून कांदे यांचा संताप होणे साहजिक.

* छगन भुजबळ यांच्या दौऱ्यात प्रतिस्पर्धी पंकज भुजबळ यांनीही पूरग्रस्तांना आश्वस्त करणे.

* पंकज भुजबळ महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातून निर्दोेष सुटणे.

* पंकज यांनी पराभवानंतरही नांदगाव मतदारसंघाशी संपर्क-संवाद कायम ठेवणे.

---------------

छगन भुजबळ यांच्या बाजूने

* पालकमंत्री या नात्याने शासनाची मदत प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी या हेतूने पंचनामे गरजेचे.

* नैसर्गिक आपत्तीत मदत देताना त्याचा पंचनामा शासकीय दस्तावेजात महत्त्वाचा पुरावा असल्याने पंचनाम्यांचा आग्रह धरणे.

* पूरग्रस्तांच्या नावे भलत्यांनीच उखळ पांढरे करून घेऊ नये हा हेतू

* पुत्र पंकजच्या निमित्ताने नांदगाव मतदारसंघाशी दहा वर्षे असलेली नाळ गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटल्याचे शल्य.

* पूरग्रस्तांच्या पाहणी दरम्यान पंकज भुजबळ यांनाही सहभागी करून पूरग्रस्तांप्रती सहानुभूतीचा फायदा उचलणे.

* आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पंकज यांची तयारी करून घेणे.

(भुजबळ-कांदे यांचे छायाचित्र वापरणे)