कागदोपत्रीच की फोटोसेशनपुरते?
By Admin | Updated: July 30, 2016 00:03 IST2016-07-30T00:02:06+5:302016-07-30T00:03:34+5:30
कागदोपत्रीच की फोटोसेशनपुरते?

कागदोपत्रीच की फोटोसेशनपुरते?
स्थळ : चांदवड
वेळ : सकाळी १० वाजता
शहर व परिसरात शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी दिनानिमित्त सर्वत्र कोटीचे उद्दिष्ट ठेवून वृक्षारोपण केले खरे; मात्र नंतर या रोपांकडे कोणी ढुंकूनही बघितले नसल्याचे विदारक चित्र चांदवड व परिसरात दिसून येत आहे.
चांदवड तालुक्यात सुमारे एक लाख रोपांची लागवड करण्यात आली असल्याचे सांगितले जाते, तर धोडंबा येथे जंगल परिसर असल्याने तेथील भाग हा संरक्षित आहे. त्यामुळे तेथे काळजी घेण्यास माणसे आहेत, तर अशाच प्रकारे ज्या-ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीने रोपांची लागवड केली तेथील परिस्थिती काहीशी बरी आहे; मात्र बऱ्याच ठिकाणी ही लागवड फक्त कागदोपत्री व फोटोसेशन पुरतीच दिसून आल्याचे विदारक चित्र दिसत आहे. चांदवड शहरात नगर परिषदेने सुमारे ६३६३ रोपांची लागवड केली. त्यापैकी चंद्रेश्वर मंदिर परिसरात नेमिनाथ जैन विद्यालयातील १९९६ च्या विद्यार्थी बॅचने वृक्षलागवड केली. ती सुमारे तीन हजारांच्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांनी रोपांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. मात्र त्यापैकी काही रोपे जनावरांनी खाल्ली हे तितकेच खरे. रोपे लावल्यानंतर त्यांना संरक्षक जाळ्या बसविणे गरजेचे आहे.