ये क्या बनाया है?

By Admin | Updated: August 3, 2014 01:57 IST2014-08-03T01:54:48+5:302014-08-03T01:57:20+5:30

ये क्या बनाया है?

What is this made? | ये क्या बनाया है?

ये क्या बनाया है?

 

नाशिक : गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी तपोवनात बांधण्यात आलेल्या नियंत्रण कक्ष आणि रुग्णालयाच्या जागेवर एका कॉलेजचा फलक बघून महंत ग्यानदासजी चक्रावले. ये क्या बनाया है, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मखलाशी करीत ये अपनाही है, आपके लिए बनवाया है, असे सांगून सारवासारव केली.
कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी आलेल्या महंत ग्यानदासजी यांच्यासह महंत भक्तिचरणदास, लहवीतकर महाराज, भोलादास महाराज, संजयदास, हेमंत दास यांनी लक्ष्मीनारायण मंदिरापासून शाही मार्ग, रामकुंड आणि तपोवनातील साधुग्राम या भागांचा धावता दौरा अधिकाऱ्यांसमवेत केला. जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. जनार्दनस्वामी ट्रस्टच्या जागेजवळ महापालिकेने गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी नियंत्रण कक्ष बांधले होते. तसेच येथेच रुग्णालयाची व्यवस्था केली होती. मात्र, आता याठिकाणी कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या खासगी महाविद्यालयाची पाटी असून, महापालिकेने ही जागा त्यांना भाड्याने दिली आहे. या वास्तूच्या बऱ्याच पुढे मोटारींचा ताफा थांबला आणि साधू-महंत त्याठिकाणी जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात महंत ग्यानदासजी तेथे गेलेच आणि त्यांनी पृच्छा केली. त्यावर शहर अभियंता सुनील खुने यांनी सारवासारव केली आणि ही महापालिकेचीच वास्तू असून, ती ११ वर्षे भाड्याने देण्यात आली आहे. कुंभमेळ्यापूर्वी ती वास्तू ताब्यात मिळेल असे सांगून सावरले.
दरम्यान, शाही मार्गाची पाहणी करताना महंत ग्यानदासजी यांनी गाडगे महाराज पुलाखालील अस्वच्छता हटवावी, तसेच वाहनतळाच्या जागा याबाबत सूचना केल्या. या दौऱ्यात मेळा अधिकारी महेश पाटील, उदय किसवे, अधीक्षक अभियंता उत्तम पवार, कार्यकारी अभियंता गौतम पगारे तसेच धनंजय बेळे, ज्ञानेश देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: What is this made?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.