शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘खाकी’चा दरारा कमी झाला की काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:13 IST

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नसलेल्यांकडून पोलीस कर्मचाºयांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण तसेच पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यापर्यंत मजल गेली आहे़

नाशिक : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नसलेल्यांकडून पोलीस कर्मचाºयांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण तसेच पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यापर्यंत मजल गेली आहे़ त्यामुळे आता पोलीस या शब्दाचा दरारा निर्माण करण्याची गरज आहे़  देशातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस दलाकडून केले जाते़ पोलीस या शब्दाचा दराराच इतका होता की, केवळ पोलिसाचे नाव काढले किंवा पोलिसांत तक्रार करतो असे म्हटले तरी वाद मिटत होते़ मात्र, कालौघात या पद्धतीत बदल झाला असून, त्यास बेजबाबदार नागरिकच नव्हे तर पोलीस यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे.रात्रीच्या वेळी टवाळखोरांवर केली जाणारी कारवाई आता थंड पडली पडल्याचे चित्र आहे़  कायद्याचे ज्ञान हे पूर्वीपेक्षा चांगले असून, कायदा तोडल्यानंतर होणारी परिणामांचीही नागरिकांना जाणीव आहे़ बदलत्या काळानुसार पोलिसांकडून विविध प्रबोधनात्मक लोकाभिमुख उपक्रम राबवले जात असून ही चांगली बाब असली तरी पोलीस या शब्दाचा धाक टिकविणेही तितकेच गरजेचे आहे़ अन्यथा, पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल़पोलीस कर्मचाºयांवरील हल्ल्याच्या काही घटना़ १० फेब्रुवारी २०१८ रोजी वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई झनकर यांनी इंदिरानगर बोगद्याजवळ नो एंट्रीमध्ये कार चालविणारे संशयित अशोक आहेर, सोमनाथ गायकवाड यांना हटकले असता या दोघांनी शिवीगाळ तसेच मारहाण केली होती़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ १२ मार्च २०१८ रोजी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर तिडके व हारुण सय्यद हे आकाशवाणी टॉवरजवळील नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करीत होते. यावेळी दुचाकीची टोर्इंग केलेली नसतानाही संशयित शेखर बर्डे यांनी हुज्जत घातली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ ८ मे २०१८ रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी व त्यांचे सहकारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फुलपाखरू देशी दारू दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेले असता संशयित राजेश मारू व भावना मारू यांनी शिवीगाळ केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ २२ मे २०१८ रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर नाका सिग्नलवर सिग्नल तोडल्याने संशयित अर्शद खालीद हुसेन बस्तीवाला यास पोलीस नाईक डी़ एल़ शहाणे व पोलीस हवालदार मधुकर सोनवणे यांनी हटकले असता त्यांना मारहाण करण्यात आली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ ३ आॅगस्ट २०१८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल संदीप पोटिंदे व पोलीस शिपाई शेळके हे हिरावाडीतील एसएसडीनगरमध्ये रात्रीच्या सुमारास गस्त घालीत होते़ यावेळी मद्यधुंद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मध्य विधानसभेचे अध्यक्ष संशयित धीरज मगर (रा़ हिरावाडी) यांना हटकले असता शिवीगाळ केली़ त्यामुळे पोलीस ठाण्यात आणले असता गोंधळ घालून पोलीस निरीक्षक ढमाळ व पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ २५ सप्टेंबर २०१८ रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक बबन थेटे व पोलीस शिपाई हे रिक्षाचालकांमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी गेले असता रिक्षाचालक संशयित स्वप्नील रणमाळे (रा. पंचवटी) याने सराईत गुन्हेगाराच्या नावाने धमकी देत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना पंचवटीतील मालेगाव स्टॅण्डवर घडली होती़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ १० आॅक्टोबर २०१८ जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या संशयित रवि वाघमारे, सचिन सोनवणे यांना पोलीस शिपाई योगेश परदेशी यांनी हटकले असता या दोघांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़लष्करी अधिकाºयांचा पोलीस ठाण्यावर हल्लातोफखाना केंद्रातील प्रशिक्षणार्थी अधिकारी हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयासोबत तक्रार देण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्यात गेला होता़ यावेळी प्रवेशद्वारासमोर लावलेल्या वाहनावरून पोलीस अधिकाºयाने सूचना केली असता लष्करी अधिकाºयाने हुज्जत घातल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यामुळे संतप्त झालेल्या तोफखाना केंद्रातील १०० ते १५० प्रशिक्षणार्थी जवानांनी जानेवारी २०१५ मध्ये उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला होता़ पोलीस ठाण्याची तोडफोड करत काही पोलीस कर्मचाºयांना जबर मारहाण करण्यात आली होती़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे