या वाहनांचे करायचे काय?

By Admin | Updated: November 19, 2015 23:12 IST2015-11-19T23:11:50+5:302015-11-19T23:12:25+5:30

पोलीस ठाण्यांना भंगाराचे स्वरूप : वाहनांचे झाले सांगाडे; पोलीस ठाणे बकाल

What do these vehicles do? | या वाहनांचे करायचे काय?

या वाहनांचे करायचे काय?

या वाहनांचे करायचे काय?पोलीस ठाण्यांना भंगाराचे स्वरूप : वाहनांचे झाले सांगाडे; पोलीस ठाणे बकालविजय मोरे ल्ल नाशिक
गुन्हेगारी घटनांमधील, चोरीची, अपघातांमधील, बेवारस, आरटीओ कारवाई यातील वाहनांची निर्धारित वेळेत विल्हेवाट लावणे शक्य होत नाही़ त्यामुळे ही वाहने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात पडून राहतात़ सद्यस्थितीत शहरातील सर्व पोलीस ठाणे आवारातील वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून यामुळे पोलीस ठाण्यांना भंगार गुदामाचे स्वरूप आले आहे़ त्यामुळे या वाहनांचे करायचे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे़ न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वाहने संबंधित मालकाच्या ताब्यात दिली जातात, परंतु ही प्रक्रिया प्रचंड वेळकाढूपणाची असते़ पोलीस आयुक्तालय स्तरावर अशा वाहनांबाबत विशेष परवानगी घेऊन या वाहनांची विल्हेवाट लावणे शक्य असले तरी यासाठी पोलिसांची सकारात्मक मानसिकताही आवश्यक आहे़

Web Title: What do these vehicles do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.