शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

माजी खासदारांचे वारसदार सध्या काय करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:07 IST

सध्या राजकारणात मुले पळविणारी टोळी कार्यरत झाल्याची टीका विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर केली जात असतानाच राजकीय घराणेशाहीचेही मुद्दे त्यानिमित्ताने जोरकसपणे पुढे आले आहेत.

नाशिक : सध्या राजकारणात मुले पळविणारी टोळी कार्यरत झाल्याची टीका विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर केली जात असतानाच राजकीय घराणेशाहीचेही मुद्दे त्यानिमित्ताने जोरकसपणे पुढे आले आहेत. जिल्ह्यातील नाशिकलोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत दिल्ली गाठणाऱ्या खासदारांच्या कुटुंबीयांचा आढावा घेतला असता, काही माजी खासदारांच्या पाल्यांनी राजकारणात सक्रिय होत निवडणुका लढविल्या आहेत तर काही खासदार पाल्यांनी निवडणुकीच्या भानगडीत न पडता आपला वेगळा मार्ग चोखाळला आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे गो. ह. देशपांडे (१९५१ आणि १९६२), आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भाऊराव गायकवाड (१९५७), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे यशवंतराव चव्हाण (१९६३), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे भानुदास कवडे (१९६७ आणि १९७१), भारतीय लोकदलातर्फे विठ्ठलराव हांडे (१९७०), कॉँग्रेस आयकडून प्रताप वाघ (१९८०), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे मुरलीधर माने (१९८४), भाजपाचे डॉ. दौलतराव अहेर (१९८९), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसकडून डॉ. वसंत पवार (१९९१), शिवसेनेचे राजाराम गोडसे (१९९६),भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे माधवराव पाटील (१९९८), शिवसेनेचे अ‍ॅड. उत्तमराव ढिकले (१९९९), राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देविदास पिंगळे (२००४) आणि समीर भुजबळ (२००९) तसेच शिवसेनेकडून हेमंत गोडसे (२०१४) हे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. गो. ह. देशपांडे आणि भानुदास कवडे यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी लाभू शकलेली नाही. १९७७ नंतर सातत्याने नवीन चेहरा दिल्लीत पाठविण्याची परंपरा नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पाळलेली आहे. आजवर लोकसभेवर निवडून गेलेल्या काही माजी खासदारांच्या कुटुंबियातून राजकारणाचा वारसा पुढे चालविला जात आहे. तर काहींच्या कुटुंबीयांनी राजकारणापासून दोन हात दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून येते. गो. ह. देशपांडे यांचे सुपुत्र कर्नल आनंद देशपांडे यांनी आपली भारतीय लष्कारात सामील होत आपली वेगळी वाट चोखाळली. दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड यांचे घरातूनही राजकारणात कुणी पुढे आले नाही. सद्यस्थितीत त्यांच्या मानसपुत्राचे पुत्र कॅप्टन कुणाल गायकवाड हे भाजपात सक्रीय आहेत. नांदगावचे भानुदास कवडे यांच्या घरातून त्यांचे पुत्र बापूसाहेब कवडे हे शिवसेनेत सक्रीय आहेत परंतु, त्यांनी खासदारकी अथवा आमदारकीची निवडणूक न लढवता किंगमेकरची भूमिका निभावणे पसंत केले आहे. भानुदास कवडे यांचे नातू तेज कवडे हे सध्या नांदगाव बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठलराव हांडे यांच्या कन्या डॉ. शर्मिला हांडे या शेकापच्या महिला ्रआघाडीच्या राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत परंतु, त्यांनीही निवडणुकीच्या राजकारणात न पडणेच पसंत केल्याचे दिसून येते. प्रताप वाघ यांच्या कुटुंबीयातून त्यांच्या कन्येने नाशिक महापालिकेची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनाही अपयश आले. तर मुरलीधर माने यांच्या कन्या श्रद्धा यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळावर काही काळ सदस्यपद भूषविले परंतु त्यासुद्धा राजकारणात सक्रीय राहिल्या नाहीत. माने यांचे पुतणे ुउद्धव पवार हे कॉँग्रेसमध्ये कार्यकर्ते म्हणूनच सक्रीय राहिले आहेत. डॉ. दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ. राहुल अहेर हे चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. डॉ. वसंत पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निलीमा पवार यांच्याकडे राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले. परंतु, निलीमा पवार यांनी राजकारणात न उतरता मविप्र शिक्षण संस्थेचाच वारसा पुढे नेण्याला पसंती दिलेली आहे. वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्टÑवादीच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. राजाराम गोडसे यांचे पुत्र युवराज गोडसे हे संसरीच्या सरपंचपदाची धुरा सांभाळत आहेत. परंतु, त्यांनी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात येण्याचा मानस दाखविलेला नाही. माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांनी नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपाकडून लढविली होती परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले हे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मात्र आता विधानसभेचे वेध लागले आहेत.देविदास पिंगळे यांच्या घरातून त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांनी नाशिक महापालिकेचे नगरसेवकपद भूषविलेले आहे. समीर भुजबळ यांच्या कुटुंबीयात त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ सध्या राष्टÑवादीत कार्यरत आहेत तर हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य यांनी एकलहरे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती परंतु, वडिल खासदार असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यशवंतरावांच्या विचारांचा वारसा इतरांकडे१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघामधून कॉँग्रेसचे गो. ह. देशपांडे निवडून गेले होते; परंतु त्यांच्या निधनानंतर १९६३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिल्लीत पाठविले. आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक नेते महाराष्टÑाच्या राजकारणात कार्यरत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक