शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांना १७ कोटी ज्यादा देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:44 IST

२०१४-१५ कुंभमेळा संपला आणि आता चार वर्षे संपली, परंतु प्रशासनाचे ठेकेदारांवरील ममत्व सुरूच असून, विविध कामांसाठी ज्यादा निविदांपोटी तब्बल १७ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला. त्यामुळे शासनाकडून आलेला निधी वाचवून कमी पैशात कुंभमेळा पार पाडल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.

नाशिक : २०१४-१५ कुंभमेळा संपला आणि आता चार वर्षे संपली, परंतु प्रशासनाचे ठेकेदारांवरील ममत्व सुरूच असून, विविध कामांसाठी ज्यादा निविदांपोटी तब्बल १७ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला. त्यामुळे शासनाकडून आलेला निधी वाचवून कमी पैशात कुंभमेळा पार पाडल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.महापालिकेने याआधी कुंभमेळ्यासाठी मिळालेला शासकीय निधी काटकसरीने वापरला. त्यामुळे तब्बल ६० कोटी रुपयांची बचत केली असा प्रशासनाचा दावा होता. सदरचा निधी अन्य योजनांसाठी वापरण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. मात्र शासनाने हा निधी परत घेतला होता. मात्र त्यानंतर आता अचानक विविध कामांच्या ठेकेदारांना १७ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवला आहे. सदरची सर्व कामे पाणीपुरवठा विभागाची असून, सर्वच कामांच्या मूळ निविदेपेक्षा १० टक्के ज्यादा दराची असल्याने नगरपालिका लेखा संहितेनुसार ही कामे त्यासाठी महासभेची प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कामे पुन्हा महासभेवर ठेवण्यात आली आहेत.सातपूर विभागात प्रभाग क्रमांक ११ मध्ये १०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणे याकामासाठी तब्बल ७ कोटी ६६ लाख ४४१ रुपये ज्यादा मोजण्यात येणार असून, म्हसरूळ शिवारातील खुल्या जागेत २० लाख लिटर्स क्षमतेचा जलकुंभ बांधून वितरण वाहिनी बांधणे (ज्यादा रक्कम १ कोटी ९३ लाख रुपये), पंचवटीत निशांत व्हिलेज खुल्या जागेत २० लाख लिटर्सचा जलकुंभ बांधणे व तत्सम कामे (जादा रक्कम दोन कोटी २० लाख रुपये), गांधीनगर येथे २० लाख लिटर्स क्षमतेचा जलकुंभ बांधणे (ज्यादा रक्कम ३७ लाख ८४ हजार रुपये) समतानगर येथे जलवाहिनी टाकणे (ज्यादा रक्कम १ कोटी ४ लाख), कुंभमेळा कालावधीत विविध पाच विभागात वाहनतळांवर स्टॅण्डपोस्ट बांधणे व अन्य कामे (ज्यादा रक्कम ३३ लाख १५ हजार रुपये) अशाप्रकारे विविध कामांसाठी १७ कोटी रुपये ज्यादा देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे.महापालिका तेव्हा आणि आतामहापालिकेने कुंभमेळ्याची कामे करताना गुणवत्ता आणि दर्जा राखतानाच प्रामुख्याने कमी दरानेच निविदा मंजूर करीत असल्याचे त्यावेळी छाती ठोकपणे सांगितले होते. परंतु आता मात्र केवळ पाणीपुरवठा या एकाच विभागासाठी १७ कोटी रुपये ज्यादा मोजण्याचा प्रस्ताव असून, अन्य विभागांचे प्रस्तावदेखील यथावकाश मांडले जाण्याची चर्चा महापालिकात वर्तुळात होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाKumbh Melaकुंभ मेळा