खैर लाकडाची चोरी पकडली
By Admin | Updated: July 24, 2016 22:20 IST2016-07-24T22:13:13+5:302016-07-24T22:20:04+5:30
खैर लाकडाची चोरी पकडली

खैर लाकडाची चोरी पकडली
सुरगाणा : हडकाईचोड वनपरिमंडळातील प्रकारकनाशी : सुरगाणा तालुक्यातील हडकाईचोड वनपरिमंडळ क्षेत्रामधील पांगारणे येथे खैर लाकडाची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले. मध्यरात्री ३ वाजता ही कारवाई करण्यात
आली.
खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारे वाहन (जीजे-१५- सी-९७०३) ताब्यात घेतले. यातून खैर लाकडाचे ४१ नग जप्त करण्यात आले. याबाबत वाहनचालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरगाणा तालुक्यातील हडकार्डतोड वनपरिमंडळातील पांगारणे शिवारातून लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी लाकडाने भरलेली सफेद कलरची टाटा सुमो सुरगाणाकडे जात असताना पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच्या उंबरठाण-वाझदा रस्त्यावर या वाहनास अडवून तपासणी केली असता त्यात ४१ नग खैराचे लाकूड मिळून आले.
पथकाने खैर लाकूड आणि टाटा सुमो ताब्यात घेतली. मध्यरात्री ३ वाजता ही कारवाई करण्यात आली. सदर टाटा सुमो गाडीची आरटीओ पासिंग गुजरातमधील आहे. गाडीची मागील नंबर प्लेटही गायब आहे. वनपरिमंडळ अधिकारी डी. एम. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक डी. एम. बहिरम, राठोड, शिंदे, वाघ, पाल, बन्सी, वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत गाडीमालक आणि चालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)