वाघ बचाव रॅलीचे इगतपुरी वनविभागाकडून स्वागत
By Admin | Updated: October 24, 2015 22:41 IST2015-10-24T22:40:18+5:302015-10-24T22:41:40+5:30
वाघ बचाव रॅलीचे इगतपुरी वनविभागाकडून स्वागत

वाघ बचाव रॅलीचे इगतपुरी वनविभागाकडून स्वागत
इगतपुरी/घोटी : देशात दिवसेंदिवस वाघांचे कमी होणारे प्रमाण या पार्श्वभूमीवर राज्यातील वनविभागाकडून व्याघ्र बचाव मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शनिवार सकाळी सात वाजता मुंबई येथून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचा शुभारंभ हे उद्घाटन वनविभागाचे ब्रँड अॅम्बॅसीडर अभिनेते अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित झाला. ही रॅली मुंबई ते चंद्रपुर मेळघाट पर्यन्त जाणार आहे. दरम्यान या रैलीचे घोटी येथे सिन्नर फाटा या ठिकाणी दुपारी बारा वाजेच्या सुमारास इगतपुरी वनविभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी इगतपुरी वनविभागाचे वनरक्षक सागर अहिरे, वनरक्षक सचिन थोरात, वन परिमंडळ अधिकारी बाळासाहेब सोनवणे, एच. एन. हांबरे, वनरक्षक खंडू शिंदे, गोरक्ष जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)