औंदाणे : बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची घरवापसी होताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांचे मनोबल वाढविले.लखमापूर गावाने स्वयंघोषित उपाययोजना करत कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळविले आहे. कोरोनामुक्त परिवाराच्या स्वागतासाठी जि. प.चे माजी सदस्य पप्पू बच्छाव, मुन्ना बच्छाव, किरण बच्छाव, सचिन बच्छाव, नीलेश दळवी, गुलाब बच्छाव, अण्णा आहिरे, बाळासाहेब भामरे आदी उपस्थित होते.
कोरोनामुक्त रुग्णांवर पुष्पवृष्टी करत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:32 IST